पुणे : ‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं खळबळजनक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलंय. किरीट सोमय्या प्रकरणावरून आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय. महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी गृहखात्याबाबत अजून एक खळबळजनक दावा केला आहे. (Chandrakant Patil praises Devendra Fadnavis and criticizes Ajit Pawar)