AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango Rate : बाजारात उशिरा एंन्ट्री तरीही ‘राजा’चा रुबाब कायम, हापूसला कोल्हापुरात विक्रमी दर

आंबा उत्पादनात घट असो की वाढ फळांच्या राजाचे अर्थात हापूस आंब्याचे महत्व कायम राहिलेले आहे. यंदा तर अनेक संकटावर मात करीत हा राजा डौलत कोकणातून संपूर्ण महाराष्ट्राकत दाखल होत आहे. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची एंन्ट्री झाली होती.

Mango Rate : बाजारात उशिरा एंन्ट्री तरीही 'राजा'चा रुबाब कायम, हापूसला कोल्हापुरात विक्रमी दर
देवगड हापूसचे महत्व कायम रहावे म्हणून आता खरेदी केंद्रवर शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे.
| Updated on: Feb 10, 2022 | 11:25 AM
Share

कोल्हापूर : आंबा उत्पादनात घट असो की वाढ फळांच्या राजाचे अर्थात (Hapus Mango) हापूस आंब्याचे महत्व कायम राहिलेले आहे. यंदा तर अनेक संकटावर मात करीत हा राजा डौलत (Kokan) कोकणातून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होत आहे. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची एंन्ट्री झाली होती. आता वातावरण निवळले असून हापूस आंबा मार्केटमध्ये दाखल होत आहे. (Kolhapur Market) कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचे आगमन झाले असून मुहूर्ताच्या सौद्यामध्ये 5 डझनाच्या पेटीला तब्बल 40 हजार 599 असा दर मिळालेला आहे. अर्थात एका आंब्यासाठी व्यापाऱ्याला 676 रुपये मोजावे लागले आहेत. वातावरणातील बदलामुळे यंदा देवगडचा हापूस बाजारात उशिराने दाखल होत आहे. मात्र, खवय्यांना त्याचीच प्रतिक्षा असून दराचा विचार न करता खरेदी केली जात आहे.

चव अन् सुगंधामुळे खवय्येगिरांना भुरळ

कोल्हापूरात कोकणासह कर्नाटकातून हापूस आंब्याची आवक होत असते. कोकणातील रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग, मालवण यासह किनारपट्टीच्या भागातून आवक होत असते. दरवर्षी कोल्हापूरातील खवय्येगिरींना हापूसच्या आगमानाची मोठी उत्सुकता असते. रत्नागिरी हापूस आंबा आकाराने लहान असला तरी त्याचा सुगंध आणि चव अप्रतिम असल्याने ग्राहकांना त्याची प्रतिक्षा असते. यंदा पहिल्या टप्प्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचे आगमन झाले होते. त्यानंतर आता कोल्हापुरात आगमन झाले आहे.

एका आंब्याची किंमत 676 रुपये

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 डझनाची एक पेटी दाखल झाली आहे. बाजारात हापूस आंबा दाखल होताच त्याच्या सौद्याला सुरवात झाली होती. मुहूर्ताच्या हापूसला दरवर्षीच विक्रमी दर मिळतो. गतवर्षी 625 रुपयांना एक आंबा पडला होता तर यंदा 676 रुपायांना. 5 डझनाची एक पेटी ही तब्बल 40 हजार 599 रुपायांना विकली गेली आहे. हे मुहूर्ताचे दर असले तरी यंदा घटलेले उत्पादन आणि निसर्गाची अवकृपा यामुळे दर चढेच राहतील असाच अंदाज व्यक्त केला जात आहे.

15 जूनपर्यंत सुरु राहणार आवक

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा आवक थोडीफार उशिराने झाली असली तरी 15 जूनपर्यंत हापूस आंब्याची आवक सुरु राहणार आहे. हंगामाच्या सुरवातीला मुंबई येथे आवक सुरु होते. कारण येथील वातावरण आंबा पिकवण्यासाठी पोषक असते. त्यामुळे 4 ते 5 दिवस आगोदर आंबा दाखल झाला तरी काही परिणाम होत नाही. मात्र, कोल्हापूरात एक दिवस आगोदरच हापूस आंबा दाखल होता. आता 15 जूनपर्यंत आवक सुरु राहणार असल्याने खवय्येगिरांना चव चाखता येणार आहे.

संबंधित बातम्या :

Onion Market: आता गावरान कांद्याची चलती, आवक वाढूनही कांद्याचे दर स्थिरावलेले

पेरले ते उगवले मात्र, पदरात नाही पडले, मुख्य आगारात हळदीचा रंग झाला फिक्कट, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?

‘नर्सरी हब’ सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा, शेतकऱ्यांसाठी नव्या योजना काय?

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.