5

Onion Market: आता गावरान कांद्याची चलती, आवक वाढूनही कांद्याचे दर स्थिरावलेले

ऊसानंतर कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. उत्पादनापेक्षा सातत्याने दरातील चढ-उतारामुळे कांदा हा चर्चेत राहिलेला आहे. आता साठवणूकीतला आणि खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरु होती. यंदा सरासरीपेक्षा अधिकची आवक होऊन देखील कांद्याचे दर स्थिर राहिले हे विशेष.

Onion Market: आता गावरान कांद्याची चलती, आवक वाढूनही कांद्याचे दर स्थिरावलेले
लाल कांद्याबरोबर आता उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत.
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 10:44 AM

सुनिल थिगळे : पुणे : ऊसानंतर कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. उत्पादनापेक्षा सातत्याने (Onion Rate) दरातील चढ-उतारामुळे कांदा हा चर्चेत राहिलेला आहे. आता साठवणूकीतला आणि खरीप हंगामातील (Onion Arrival) कांद्याची आवक सुरु होती. यंदा सरासरीपेक्षा अधिकची आवक होऊन देखील कांद्याचे दर स्थिर राहिले हे विशेष. अन्यथा रात्रीतून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच. शिवाय आता पुण्यातील (Khed Agricultural Market Committee) खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये गावरान कांद्याची आवक वाढत आहे. इतर कांद्यापेक्षा गावरान कांद्याला वेगळेच महत्व आहे. हॉटेल व्यवसायिक या कांद्याचा अधिकचा वापर करतात. शिवाय आवक वाढूनही कांद्याचे दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

4 हजार क्विंटल कांद्याची आवक

गावरान कांद्याची लागवड क्षेत्रच मुळात कमी आहे. पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये 8 हजार पिशवी म्हणजे 4 हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन प्रतवारी नुसार 1 हजार 500 ते 2 हजार 800 पर्यंतचा दर मिळत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पादनावर परिणाम झालेला असला तरी सध्या गावरान कांद्याची आवक सुरु झाली आहे. गावरान कांद्याला अधिकची मागणी असते. त्यामुळे भविष्यात चाकण मार्केटमधून कांद्याची आवकही केली जाणार असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

निर्यातीचा शेतकऱ्यांना अधिकचा फायदा

गेल्या काही दिवसांपासून चाकण येथील बाजारपेठेत गावरान कांद्याची आवक सुरु झाली असली तरी सध्या स्थानिकचेच ग्राहक अधिकचे आहेत. त्यामुळे सरासरी 2 हजार 200 रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, याच कांद्याची निर्यात सुरु झाली तर दरात वाढ होणार असल्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत. आतापर्यंत खरीप हंगामातील आवक सुरु होती पण आता गावरान कांद्याची आवक सुरु झाल्याने गावरान कांद्याला अधिकची पसंती दिली जात आहे.

सोलापूरमध्ये आवक सुरुच

यंदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीप हंगामातील कांद्याची विक्रमी आवक झालेली आहे. जानेवारी महिन्यात विक्रमी आवकमुळे दोन वेळेस बाजारातील लिलाव हे बंद ठेवावे लागले होते. सध्याही दिवसाकाठी 60 ते 70 हजार क्विंटल कांद्याची आवक सुरु असून दरही चांगला टिकून आहेत. 2 हजार रुपये क्विटलचा सरासरी दर असल्यामुळे मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामधून कांद्याची आवक सुरु आहे.

संबंधित बातम्या :

पेरले ते उगवले मात्र, पदरात नाही पडले, मुख्य आगारात हळदीचा रंग झाला फिक्कट, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?

सुविधांपेक्षा अडचणी अधिक : हमीभाव केंद्रावरच नाही पैशाची हमी, शेतकरी सावकाराच्या दारात

‘नर्सरी हब’ सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा, शेतकऱ्यांसाठी नव्या योजना काय?

Non Stop LIVE Update
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश