मांजरा धरणाची शंभरीकडे वाटचाल, तीन जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी

जायकवाडी प्रकल्पात 60 टक्के पाणीसाठा झाला आहे तर बीड, उस्मानाबाद आणि लातुर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या मांजरा धरणात 90 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे शिवाय शेतीसाठीही या पाण्याचा वापर केला जाणार आहे.

मांजरा धरणाची शंभरीकडे वाटचाल, तीन जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी
मांजरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक असून 90 टक्के पाणीसाठा झाला आहे.

बीड : मराठवाड्यात होत असलेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे याच पावसामुळे मराठवाड्यातील आठही मोठी धरणे भरल्याने भविष्यातील पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे. जायकवाडी प्रकल्पात 56  टक्के पाणीसाठा झाला आहे तर बीड, उस्मानाबाद आणि लातुर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या मांजरा धरणात 90 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे शिवाय शेतीसाठीही या पाण्याचा वापर केला जाणार आहे.

दरवर्षी परतीच्या पावसाने मराठवाड्यातील धरणे ओव्हरफ्लो होतात. मात्र, यंदा ऑगस्ट माहिन्यापासूनच मराठवाड्यात पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. त्यामुळे माजलगाव धरण 97 टक्के, मांजरा धरण 92 टक्के, निम्न दुधना 99 टक्के, येलदरी 100 टक्के, सिध्देश्वर 100 टक्के, पेनगंगा 100 टक्के, मानार 100 टक्के, निम्न तेरणा 78, विष्णूपुरी 96 टक्के ही प्रकल्पांची स्थिती आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटला आहेच शिवाय शेती आणि उद्योग व्यवसयालाही यंदा या जलसाठ्याचा उपयोग होणार आहे.

उस्मानाबाद, बीड आणि लातुर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा धरणाची उभारणीच शेतीच्या पाण्यासाठी झाली होती. मात्र, काळाच्या ओघात धरणालगतच्या तीन ही जिल्ह्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाल्याने सर्वप्रथम पिण्याचे पाणी राखून ठेवले जात आहे. त्यानंतर उद्योग आणि अधिकचा साठा झाला तर शेतीसाठी पाणी उपलब्ध केले जात आहे. मात्र, गतवर्षीपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतीसाठीही पाणी दिले जात आहे. मांजरा धरणाच्या उगमस्थानापासून 14 बंधारे तसेच लहान-मोठे 26 तलाव उभारण्यात आले असतानाही यंदाही धरण हे पूर्ण क्षमतेने भरणार आहे.

रविवारी धरणात 199.550 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 24 दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याची आवश्यकता आहे. लातुर शहरासह उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आणि बीड जिल्ह्यातील धारुर, केज, अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा मराठवाड्यातील प्रमुख आठही धरणे भरलेली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती आणि उद्योगालाही पाणी पुरवठा होणार असल्याचे चित्र आहे.

उद्योगासाठी पाण्याला बीडकरांचा विरोध

दोन वर्षापुर्वी मांजरा धरणाची पाणीपातळी खालावलेली होती. धरणातील मृतसाठ्यात असल्याने पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा दहा दिवसातून एकदा असा केला जात होता. त्यामुळे लातुर येथील उद्योगाला राखून ठेवलेले पाणी हे केवळ पिण्यासाठीच उपलब्ध व्हावे अशी मागणी बीडकरांनी केली होती. मात्र, दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी मिळून तोडगा काढला होता.

ऊस लागवडीत होणार वाढ

मांजरा नदीलगतचे क्षेत्र हे ग्रीन बेल्ट म्हणून ओळखले जाते. मांजरा धरण प्रामुख्याने उस्मानाबाद आणि बीड जिल्हा हद्दीत असले तरी यातील पाण्याचा अधिकचा वापर हा लातुरकरांसाठी होत आहे. पिण्याच्या पाण्यसह शेतीला आणि उद्योगालाही या धरणातीलच पाणी वापरले जाते. यंदा तर सप्टेंबर महिन्यातच धरण पुर्ण क्षमतेने भरेल असे चित्र आहे. त्यामुळेही यंदा ऊसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

गतवर्षी उद्योग क्षेत्राला लागले होता ब्रेक

अनियमित पावसाचा परिणाम येथील शेती क्षेत्रवरच नाही तर उद्योग व्यवसयांवरही होता. दोन वर्षापुर्वी मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे लातुरसह बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली होती. मांजरा धरणातील पाणी हे केवळ पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले होते. परिणामी येथील उद्योगांना पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने काही काळ उद्योग व्यवसायाला ब्रेक लागले होते. Manjra-dam-moves-towards-over-flow-irrigation-problem-in-beed-osmanabad-and-latur

इतर बातम्या :

आई-वडील दिव्यांग असतील तर आयकरात मिळते सूट, जाणून घ्या काय आहे नियम?

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा घट, सक्रिया रुग्णसंख्याही खाली

Maharashtra News LIVE Update | कोयना धरणातून पाणी विसर्ग आणखी वाढवणार, 6 दरवाजे 4 फुटानं उचलणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI