आई-वडील दिव्यांग असतील तर आयकरात मिळते सूट, जाणून घ्या काय आहे नियम?

Income Tax | कलम 80DD नुसार, पालक, पत्नी, मुले, भाऊ आणि बहिणींच्या उपचारांवर किंवा सेवेवर होणारा खर्च या कलमांतर्गत करातून सूट आहे. हिंदू संयुक्त कुटुंबाच्या बाबतीत, अपंगत्व असलेला कोणताही सदस्य तेथे असू शकतो.

आई-वडील दिव्यांग असतील तर आयकरात मिळते सूट, जाणून घ्या काय आहे नियम?
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 10:08 AM

मुंबई: जर तुम्ही अपंग पालकांची सेवा करत असाल तर तुम्ही त्यांच्यावरील खर्चाचा आयकरात दावा करू शकता. त्यासाठी एक खास नियम आहे. हा नियम आयकरच्या कलम 80DD शी संबंधित आहे जो अपंग लोकांसाठी बनवला गेला आहे. (Income Tax claim rules)

जर एखाद्या व्यक्तीचे पालक 40 टक्क्यांहून अधिक अपंग असतील तर ती व्यक्ती कलम 80 डीडी अंतर्गत आयकर सूट घेऊ शकते. अपंग असलेल्या पालकांवर 40 टक्क्यांपर्यंत 75 हजार रुपये खर्च केले तर त्यांना त्याचा लाभ मिळतो. या पैशाचा आयकरात दावा केला जाऊ शकतो. जर कुटुंबात दोन भाऊ असतील, दोघेही त्यांच्या आईवडिलांवर खर्च करत असतील, तर त्यांचा खर्च किती होतो हे पाहिले जाईल. जर दोन्ही भावांनी 75-75 हजार रुपये खर्च केले तर दोन्ही भाऊ आयकर दावा करू शकतात.

कलम 80DD नुसार, पालक, पत्नी, मुले, भाऊ आणि बहिणींच्या उपचारांवर किंवा सेवेवर होणारा खर्च या कलमांतर्गत करातून सूट आहे. हिंदू संयुक्त कुटुंबाच्या बाबतीत, अपंगत्व असलेला कोणताही सदस्य तेथे असू शकतो. दोन भावांनी 75-75 हजार रुपये खर्च केल्यास या कलमांतर्गत एकूण कपातीची मर्यादा 1.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

सेक्शन 80 U अंतर्गत टॅक्स क्लेम

कलम 80U आहे ज्या अंतर्गत अपंग व्यक्ती स्वत: साठी कपातीचा दावा करू शकतात. अपंग व्यक्ती 80U अंतर्गत करमुक्तीचा दावा स्वतःसाठी करते, तर इतर कोणतीही व्यक्ती अपंग व्यक्तीसाठी 80DD अंतर्गत कर दावा करू शकत नाही. कोणताही भारतीय व्यक्ती कलम 80DD अंतर्गत कपातीचा दावा करू शकतो. यात आश्रित अपंगांच्या उपचार, प्रशिक्षण आणि पुनर्वसनाशी संबंधित खर्चाचा समावेश आहे. यासाठी काही अटी आहेत. संबधित व्यक्ती आश्रित आणि काम करण्यास असमर्थ असेल, तरच हा लाभ मिळतो. अपंगत्वाची पातळी 40 टक्क्यांपेक्षा कमी नसावी.

टॅक्स क्लेम कसा निश्चित होतो?

या नियमात विशेष गोष्ट अशी आहे की कर कपातीची रक्कम वयानुसार नाही तर अपंगत्वाद्वारे निर्धारित केली जाते. कर दावा हा अपंग व्यक्तीच्या टक्केवारीवर अवलंबून असतो. जर पीडित व्यक्ती 40 टक्क्यांपेक्षा जास्त परंतु 80 टक्क्यांपेक्षा कमी अपंग असेल तर 75 हजारांपर्यंत वजावटीचा दावा केला जाऊ शकतो. जर अपंगत्व गंभीर असेल तर ही रक्कम 1.25 लाख रुपयांपर्यंत असू शकते. हे लक्षात घ्यावे लागेल की अपंगत्वाची टक्केवारी योग्यरित्या नमूद करावी लागेल. कर वाचवण्यासाठी एखाद्याला कोणत्याही प्रकारचा खोटेपणा टाळावा लागतो. चुकीची माहिती दिल्याबद्दल करदात्यावर आयकर विभाकाडून कारवाई देखील होऊ शकते.

संबंधित बातम्या:

आयकर विभागाचा धाक दाखवत मागितली 60 लाखांची खंडणी, व्हिडीओ समोर आल्याने औरंगाबादेत खळबळ

आयकर रिफंडवर सगळ्यांनाच मिळत नाही व्याज; जाणून घ्या तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो का?

आयकर विभागाकडून ई-मेल आला असेल तर दुर्लक्ष करू नका, होईल मोठं नुकसान

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.