मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, लाखो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

| Updated on: Jun 23, 2021 | 11:27 AM

मराठवाड्यातील 76  पैकी 60 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. तर, पावसानं दडी मारल्यामुळे आतापर्यंत झालेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे.

मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, लाखो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
शेतकरी प्रातिनिधिक फोटो
Follow us on

औरंगाबाद : मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, नंतर पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत. मराठवाड्यातील 76  पैकी 60 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. तर, पावसानं दडी मारल्यामुळे आतापर्यंत झालेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. (Marathwada 60 taluka facing problem of drought due to lack of Monsoon Rain)

मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे.

76 तालुक्यांपैकी 60 तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील 76 पैकी 60 तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. पुरेशा प्रमाणात पाऊस होत नसल्यानं 60 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे.

लाखो शेतकरी हवालदिल

पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. पाऊस नसल्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. मराठवाड्यात खरिपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे सगळीच पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

75 ते 100 मिलीमीटर पावसाशिवाय पेरणी करु नये

मान्सून पावसाचा लहरीपणा पाहता शेतकऱ्यांनी सध्या सोयाबीन, बाजरी, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणी साठी शेतजमीन नांगरणी आज वखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. तर सर्व शेतकऱ्यांनी किमान 75 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो तर खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्या मुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते.

संबंधित बातम्या:

बुलडाण्यात पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

स्ट्रॉबेरी शेतीतून मोठ्या कमाईची हमी, शेतकऱ्यांना एक एकरात 8 लाखांच्या उत्पन्नाची संधी

(Marathwada 60 taluka facing problem of drought due to lack of Monsoon Rain)