Dry Drought: पाणी वाया घालवाल तर खबरदार! 25 हजारांपर्यंत दंड, मराठवाड्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काय मोठी अपडेट?

Marathwada Dry Drought: दु्ष्काळ आता मराठवाड्यासह राज्याच्या मानगुटीवर बसला आहे. हिवाळ्यातच उन्हाळी चटके सहन करावे लागत असल्याने पाणी कपातीचे धोरण अवलंबिले जात आहे. तर अनेक ठिकाणी पीक पंचनाम्याला वेग आला आहे.

Dry Drought: पाणी वाया घालवाल तर खबरदार! 25 हजारांपर्यंत दंड, मराठवाड्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काय मोठी अपडेट?
मराठवाडा दुष्काळ, पाणीबाणी
| Updated on: Oct 07, 2026 | 9:45 AM

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालना शहरातील नागरिकांनी पाणी वायाला घालवल्यास आता 5 हजारापासून पासून तर 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे आणि तसे आदेशही महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी काढले. घरगुती नळ जोडणी तोट्या आणि अंतर्गत जलवाहिनीला गळती असल्यास 15 ऑक्टोबर पर्यंत दुरुस्त करून घेण्याच्या सूचना आयुक्तानी दिल्या शिवाय पाणी भरल्यानंतर नळ तात्काळ बंद करावेत असंही आदेशात म्हटलंय,दरम्यान महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार लावणे, रस्त्यावर वाहन धुणे,घरासमोरील रस्ता धुऊन काढणे अशा प्रकारचा पाण्याचा अपव्यय आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचा इशाराही दिला आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

दुष्काळी पिकांचे पंचनामे करण्याला वेग

Loading...

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आन्वा महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या दुष्काळी पिकांचे पंचनामे करण्याला वेग आला असून तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या पथकाकडून शेतकर्‍यांच्या बांधावर जात संयुक्त वाहने करण्यात येत आहे,तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव, पारध यासह आसपासच्या गावांमध्ये पंचनामे देखील झाले असून आता आता महसूल विभागाकडून इतर ठिकाणचे पंचनामे करण्यातही वेग आल्याचे चित्र पाहायला मिळते, जिल्ह्यात मागील दीड ते दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन कपाशी यासह इतर पिकं करपून गेल्याने दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आधी देण्यात आले होते.

बदनापूर तालुक्यात पिकांचे पंचनामे

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर प्रशासनाकडून दुष्काळी पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या गेवराई बाजार सह परिसरातील विविध गावांमध्ये तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करण्यात आली.जिल्ह्यात मागील दीड ते दोन महिन्यापासून पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन,कपाशी आणि इतर खरीप पिकांना मोठा फटका बसलाय,शेतातील पिकांची सद्यस्थिती,झालेल्या नुकसानीचे प्रमाण आणि दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती याची संयुक्त पाहणी करून प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत.

चारा संकटामुळे दूग्ध व्यवसाय धोक्यात

धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यामध्ये जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ओला चारा संपल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत गेली दोन महिन्यापासून या परिसरात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांकडे दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे लवकरात लवकर सरकारने जनावरांना चारा देण्याची सोय करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत,

यवतमाळमध्ये सोयीबीनचे उत्पादन घटले

यवतमाळ जिल्ह्यात यंदा वरुणराजाने अवकृपा दाखविल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे. जिल्ह्यात सोयाबीन पीक कापणी प्रयोग सुरू आहे. यवतमाळ तालुक्यातील बोरगाव येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या समक्ष शेतकरी नरेश बाजीराव गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची कापणी व मळणी करण्यात आली. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे प्रयोगाचे उत्पादन केवळ १.०९ क्विंटल प्रति हेक्टरी आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us