Milk Production : दूध दर वाढले अन् उत्पादन घटले..! आता एकाच पर्यायावर शेतकऱ्यांची भिस्त

राजेंद्र खराडे

राजेंद्र खराडे |

Updated on: Aug 26, 2022 | 4:15 PM

गेल्या दोन ते अडीच वर्षापासून दुधाचे दर हे स्थिरावलेलेच होते. तर दुसरीकडे पशूखाद्याचे दर हे दोन महिन्यातून एकदा वाढणार हे ठरलेलेच असत. मात्र, एप्रिल महिन्यात दुधाच्या दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ झाली तर चालू महिन्यातही दुध दर वाढले आहे. ही वाढ जरी लक्षात येण्यासारखी असली तरी देशाच्या पातळीवर दुधाचे घटते उत्पादन ही चिंतेची बाब आहे.

Milk Production : दूध दर वाढले अन् उत्पादन घटले..! आता एकाच पर्यायावर शेतकऱ्यांची भिस्त
देशातील दूध उत्पादनात घट

मुंबई : गेल्या चार महिन्यांमदध्ये (Milk Rate) दुधाच्या दरात सलग दोनवेळा वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असले तरी दुसरीकडे धक्कादायक अहवालही समोर आला आहे. देशातील (Climate Change) हवामान बदलामुळे (Milk Production) दूध उत्पादनात तब्बल 11 टक्के ही घट झालीय. दूध दर वाढूनही परस्थिती जैसे थे..! असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामधला फरक थेट शेतकऱ्यांच्या लक्षात आला नसला तरी दिवसेंदिवस पशूखाद्याचे वाढते दर आणि दुसरीकडे दूध उत्पादनावरच थेट परिणाम होत असेल तर दुग्ध व्यावसायासाठी हे धोकादायक आहे. प्रतिकूल परस्थितीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर वेळीच उपाययोजना नाही निघाल्यास याचा थेट परिणाम व्यवसायावर होणार आहे. शिवाय भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे.

दुधाच्या दरात वाढ

गेल्या दोन ते अडीच वर्षापासून दुधाचे दर हे स्थिरावलेलेच होते. तर दुसरीकडे पशूखाद्याचे दर हे दोन महिन्यातून एकदा वाढणार हे ठरलेलेच असत. मात्र, एप्रिल महिन्यात दुधाच्या दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ झाली तर चालू महिन्यातही दुध दर वाढले आहे. ही वाढ जरी लक्षात येण्यासारखी असली तरी देशाच्या पातळीवर दुधाचे घटते उत्पादन ही चिंतेची बाब आहे. जर अशीच परस्थिती राहिली तर उत्पादनात आणखी घट होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय तर अडचणीत आहेच पण आता जोडव्यवसायालाही धोका निर्माण झाला आहे.

11 टक्क्यांनी घटले दुधाचे उत्पादन

शेतीच्या जोडव्यवसायात वाढ व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळे प्रयत्न करीत आहे. शिवाय या जोड व्यावसायाचाच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार आहे. असे असले तरी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. देशातील दूध उत्पादनात 11 टक्क्यांनी घट झाली आहे. वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे ही परस्थिती ओढावली असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्पादन घटले असले तरी होणार खर्च हा कायम आहे. त्यामुळे आता दूध दरवाढीचा दिलासा असला तरी भविष्याता काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे.

शास्त्रज्ञांचे संशोधन हाच पर्याय

दूध उत्पादनात घट झाली असली तरी त्यामध्ये वाढ कशी करायची याअनुशंगाने शास्त्रज्ञांचे संशोधन हे सुरु आहे. निर्माण झालेल्या प्रतिकूल परस्थितीवर उपाय योजना राबवली जात आहे. शिवाय जगात सर्वाधिक दूध उत्पादक म्हणून भारताची ओळख आहे. ही ओळख कायम ठेवण्याच्या दृष्टीने आता संशोधक प्रयत्न करीत आहे. हवामान बदलामुळे हे सर्व झाले असल्याने यावरच काय पर्याय काढला जाऊ शकतो हे पहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI