Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk Rate : दूध उत्पादकांचा खर्चही निघेना, डेअरीवाले खातायेत मलाई, भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी

Milk Rate : सध्या राज्यात दुधाचे भाव तुफान वधारले आहेत. अनेक ठिकाणी म्हशीचे दूध गुणवत्तेनुसार 60 ते 90 रूपयांच्या घरात पोहचले आहे. पण यामध्ये शेतकर्‍यांना काहीच फायदा मिळत नसल्याची ओरड होत आहे.

Milk Rate : दूध उत्पादकांचा खर्चही निघेना, डेअरीवाले खातायेत मलाई, भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी
दुधाचा भाव वधारला
Follow us
| Updated on: Jan 19, 2025 | 3:04 PM

राज्यात कोरोनानंतर दुधाचे दर सातत्याने वाढत आहे. गुणवत्तेनुसार दुधाचे भाव 60 ते 90 रुपयांच्या घरात आहेत. बाजारात दुधासाठी ग्राहकांचा खिसा कापल्या जात असला तरी शेतकर्‍यांना त्याचा काहीच फायदा होत नसल्याची ओरड होत आहे. पशुधन महाग होत आहे. चारा, कडबा महागला आहे. त्यात दूध संकलन करून दूध डेअरीला पोहचवले जाते. पण त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. त्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचा आरोप होत आहे. दूध डेअरवालेच मलई खात असल्याचा आरोप करण्यात येत आहे

28 रुपये लिटर भाव

सोलापूर जिल्ह्यातील करमाळयात जिल्हा दूध संघ तालुक्यात बंद असल्याने खाजगी दूध केंद्र शेतकर्‍याकडून केवळ 28 रुपये लिटर प्रमाणे दूध खरेदी करतात. तर त्या दूधावर प्रक्रीया केल्यानंतर त्याची विक्री मात्र 60 रुपये दराने होत आहे. त्यामुळे खाजगी दूध केंद्र चालवणारे मालामाल होत असले तरी दूध उत्पादक शेतकर्‍यांना मात्र ना नफा ना तोटा या तत्त्वावर दुग्ध व्यवसाय करावा लागत असल्याचे दिसते.

हे सुद्धा वाचा

दूध उत्पादनाचा व्यवसाय आतबट्ट्याचा

वास्तविक दुग्ध व्यवसाय करताना पशुधनाची जोपासना हा मुख्य भाग आहे दूध दरवाढीसाठी हिरवा चारा,पेंड खुराक,औषधोपचार, वैरण, घास,पशुवैद्यकीय उपचारासाठी यासाठी शेतकऱ्यांना रोख पैसे मोजावे लागतात. त्यातच पशुखाद्य व खुराकांचे भाव दर तीन-चार महिन्याला वाढतात. मात्र दुधाचे दर जैसे थे राहत असल्याने हातात दमडीही राहत नसल्याचे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी सांगत आहेत.

प्रति लिटर 60 रुपये हमीभाव देण्याची मागणी

एकीकडे पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असताना दुसरीकडे चांगल्या प्रतीच्या दुधाला देखील योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने प्रति लिटर दुधाला 60 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादकातून होत आहे.

असे आहेत पशुखाद्याचे दर

सरकी पेंड‌ : 30 ते 33 रुपये प्रति किलो शेंगदाणा पेंड : 40 ते 45 रूपये प्रति किलो सुग्रास : 30 ते 35 रुपये प्रति किलो.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.