AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : मातोश्रीने ‘त्या’ सापांना दूध पाजले, नितेश राणेंचा सर्वात मोठा आरोप, बांगलादेशीविरोधात राबवणार आक्रमक मोहीम

Nitesh Rane attack on Udhav Thackery : सैफ अली खान प्रकरणात पुन्हा बांगलादेशी कनेक्शन समोर आले. त्यावरून आता राजकारण तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

Nitesh Rane : मातोश्रीने 'त्या' सापांना दूध पाजले, नितेश राणेंचा सर्वात मोठा आरोप, बांगलादेशीविरोधात राबवणार आक्रमक मोहीम
नितेश राणे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jan 19, 2025 | 2:19 PM
Share

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हा बांगलादेशातील असल्याचे समोर आल्याने आता राज्यात संतापाची लाट उसळली. त्यावरून राजकारण तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी याच मुद्दावरून द्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी यावेळी बांगलादेशी घुसखोरांना इशारा दिला. बांगलादेशींविरोधात आक्रमक मोहिम राबवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मातोश्रीने हिरव्या सापांना दूध पाजले

यावेळी नितेश राणे यांनी मातोश्रीवर जोरदार प्रहार केला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मत मिळवण्यासाठी, स्वतःच्या भावाला निवडून आणण्यासाठी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचं मतदान मिळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी मातोश्रीवर केला. इतक्या वर्षापासून उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. पण त्यांनी काहीच केले नाही. उलट मातोश्रीवर या हिरव्या सापांना दूध पाजणारे वावरतात असा घणाघात त्यांनी केला.

या प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. कुणाच्या आशिर्वादाने बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचं मुंबईत वास्तव्य वाढलं असा सवाल त्यांनी केला. ही घाण अगोदर त्यांनी साफ करावी असे आवाहन त्यांनी आदित्य ठाकरे यांना केले. आमच्या सरकारवर बोलण्याअगोदर त्यांनी ही घाण साफ करावी असा घणाघात त्यांनी केला.

राणे बांगलादेशींविरोधात आक्रमक

राणे यांनी बांगलादेशींविरोधात आक्रमक मोहीम राबवविणार असल्याचे सांगितले. जर ते नाव बदलून राहत असतील तर त्यांनी बोरा बिस्तरा गुंडाळावा आम्ही कोणालाही सोडणार नाही, नितेश राणे यांनी असा इशार बांगलादेशी घुसखोरांना दिला.

त्यांना भारताला इस्लामिक राष्ट्र

बांगलादेशी लोकांना भारत इस्लामिक राष्ट्र करायचे आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.भारतात त्यांना आधार कार्ड कागदपत्र देणार मोठं जाळ आहे. यात बडे मासे अडकणार आहेत तुम्ही बघा आता आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. बांगलादेशी मुसलमानान दूर करणे हे सगळ्याच काम असलं पाहिजे, असे ते म्हणाले. आता राजकारणात बांगलादेशींचा नवीन मुद्दा  तापण्याची आणि त्यावरून आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...