महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचं कमबॅक, पाऊस आला पण पिकं वाचणार का?

आता महाराष्ट्रातील काही भागात पावसानं कमबॅक केलं आहे. मात्र, एवढ्या पावसावर पिकं वाचणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचं कमबॅक, पाऊस आला पण पिकं वाचणार का?
भंडाऱ्यात पावसाचं कमबॅक


मुंबई: महाराष्ट्रात यंदा मान्सूनच्या पावसानं वेळेआधीच एन्ट्री घेतली. जून महिन्यात पहिल्या पंधरावड्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यात जवळपास 27 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र, नंतरच्या काळात पावसात खंड पडल्यानं राज्यात ठिकठिकाणी पिकं उन्हामुळं माना टाकू लागली होती. तर, शेतकरी मिळेल त्या मार्गानं पिक जगवण्याचा प्रयत्न करत होता. आता महाराष्ट्रातील काही भागात पावसानं कमबॅक केलं आहे. मात्र, एवढ्या पावसावर पिकं वाचणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जर राज्यात अंदाजानुसार चार दिवस पाऊस झाला तर पिकांना पुन्हा एकदा उभारी मिळू शकते. (Monsoon Update 2021 Rain shower in Nanded Wardha Bhandara Washim Hingoli is helpful to farmers to save crop )

नांदेडमध्ये शेतकऱ्यावरील दुबार पेरणीचं संकट टळलं

नांदेड जिल्ह्यात सुमारे बारा दिवसानंतर पावसाचे पुनरागमन झालय. मध्यरात्रीपासून पावसाने नांदेड जिल्ह्यातील विविध भागात हजेरी लावलीय. जिल्ह्यात कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस झालाय. पहाटेपर्यंत पावसाच्या या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे जिल्ह्यातील दुबार पेरणीचे संकट टळल असून पिकांना जीवदान मिळालंय. त्यामुळे खरिप हंगामावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.

भंडाऱ्यातही पावसाचं कमबॅक

बहुप्रतिक्षीत अशा पावसानं भंडारा जिल्ह्यात आगमन झाले आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या जवळपास वाळण्याच्या स्थितीत असताना पाऊस आल्यामुळे शेतकरी राजा आनंदित झाला आहे. तर, वातावरणात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत झाल्यामुळे सामान्य जनता ही आनंदित झाली आहे.

वाशिममध्ये खरिपांच्या पिकांना नवसंजिवनी

वाशिम जिल्ह्यात कारंजा, मानोरा,मंगरुळपीर तालुक्यात काही ठिकाणी दहा ते पंधरा दिवसानंतर जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे खरिपाच्या सोयाबीन, तूर पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. पाऊस झालेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

वर्धा शहरासह लगतच्या परिसरात विजांच्या कडकडाटसह पाऊस झाला आहे. पंधरा ते वीस मिनिटं पाऊसधारा बरसल्या. वर्धा, सेलू परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. पाऊस आलेल्या भागात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. इतर भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

अंबरनाथच्या ग्रामीण भागात शेती कामांना वेग

अंबरनाथ आणि बदलापूर शहरासह उल्हासनगर, अंबरनाथ ग्रामीण परिसरात जवळपास दोन तास अखंडपणे जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तर दुसरीकडे ग्रामीण भागात शेतीच्या कामांनाही हा पाऊस पोषक ठरणार असून आता शेतीच्या उर्वरित कामांना वेग येणार आहे.

चंद्रपूरला मुसळधार पावसाची प्रतीक्षा

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी तर इतर भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. पावसाच्या आगमनाने कापूस, सोयाबीन आणि तूर पिकाला फायदा झाला आहे. मात्र, धान पिकाला अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

हिंगोलीत 15 दिवसानंतर पावसाचं कमबॅक

हिंगोली जिल्ह्यात तब्बल 15 दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रात्री पासून कुठे जोरदार तर कुठे मध्यम पाऊस झाल्याने उगवण झालेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे.

इतर बातम्या

Weather Alert : राज्यात आजपासून मुसळधार, पुढील 4 दिवस कुठे-कधी पाऊस?

मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राचं पुढचं पाऊल, प्रशिक्षणासाठी मत्स्य सेतू ॲप लाँच

(Monsoon Update 2021 Rain shower in Nanded Wardha Bhandara Washim Hingoli is helpful to farmers to save crop )

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI