पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा, भरपावसात खासदार चिखलीकर शेतकऱ्यांच्या बांधावर

भर पावसात चिखलीकरांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक शेतात जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा, भरपावसात खासदार चिखलीकर शेतकऱ्यांच्या बांधावर

नांदेड : धर्माबाद तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीच जबर नुकसान झालं (Crop Damage Due to Rain). या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी धर्माबादमध्ये नुकसान पाहणी दौरा केला (MP Pratap Patil Chikhalikar). विशेष म्हणजे भर पावसात चिखलीकरांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक शेतात जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचं जबर नुकसान केलं. सीमावर्ती भागातील धर्माबाद तालुक्यात तर पावसाने कहरच केला. याबाबत खासदार चिखलीकर यांना कार्यकर्त्यांनी कल्पना दिली. मुंबईत असलेल्या चिखलीकरांनी थेट मुंबईहून धर्माबाद गाठले. या दरम्यान, ते नांदेडला आपल्या घरी देखील गेले नाहीत. मुंबईहून थेट धर्माबादला पोहचून खासदार थेट बांधावर गेले. खासदार नुकसानीची पाहणी करतानाच अचानक जोरदार पाऊस आला, मात्र चिखलीकरांनी आपली पाहणी थांबवली नाही.

यावेळी खासदारासोबत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर, श्रावण भिलवंडे आणि स्थानिकचे सर्व प्रमुख अधिकारी खासदारा सोबत होते. यावेळी खासदारांनी रत्नाळी, चिकना, पाटोदा आदी गावातील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणी दरम्यान खासदार चिखलीकरांनी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राज्य आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी हताश होऊ नये असा दिलासा खासदारांनी शेतकऱ्यांना दिला. खासदारांच्या या भेटीमुळे शेतकऱ्यांना मानसिक बळ मिळण्यास मदत झालीय. सरकारी मदत मिळेल तेव्हा मिळेल पण थेट खासदार बांधावर पोहोचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *