नांदेडच्या युवा शेतकऱ्याची कमाल, ड्रॅगन फ्रुट शेतीमधून साधली प्रगती

नांदेडच्या युवा शेतकऱ्याची कमाल, ड्रॅगन फ्रुट शेतीमधून साधली प्रगती
मधुकर पांचाळ, युवा शेतकरी

नांदेडमध्ये ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचा प्रयोग एका तरुण शेतकऱ्यांने यशस्वी करून दाखवलाय. Madhukar Panchal dragon fruit

Yuvraj Jadhav

|

Mar 28, 2021 | 3:42 PM

नांदेड: महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपारिक शेतीसोबत नव्या वाटा शोधत असल्याचं चित्र सर्वत्र दिसते. नांदेडमध्ये ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचा प्रयोग एका तरुण शेतकऱ्यांने यशस्वी करून दाखवलाय. मधुकर पांचाळ असं युवा शेतकऱ्याचं नाव आहे. ड्र्रॅगन फ्रुटसोबतचे आंतरपीक देखील घेतात. (Nanded Madhukar Panchal doing dragon fruit farming)

व्हिडीओ पाहून सुचली कल्पना

उमरी तालुक्यातील सेलगाव इथले युवा शेतकरी मधुकर पांचाळ यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. व्हिडीओ पाहून त्यांना ड्रॅगन फ्रुट शेतीची कल्पना सुचली. कमी पाण्यात आणि अत्यंत कमी खर्चात ड्रॅगन फ्रुटचे यशस्वी उत्पादन झाल्याचे या शेतकऱ्यांने सांगितलंय. विशेष म्हणजे या ड्रॅगन फ्रुटच्या शेतीत अन्य आंतरपीक देखील चांगल्या प्रकारे घेता येते. अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून जगभरात या ड्रॅगन फ्रुटची ओळख आहे. मधुकर पांचाळ ड्रॅगन फ्रुट शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. त्यांनी कांद्याचे आंतरपीक देखील घेतले.

दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना संधी

महाराष्ट्रातील दुष्काळी आणि कमी पाण्याची सोय उपलब्ध असणाऱ्या भागातील शेतकरी ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. साधारणपणे ड्रॅगन फ्रुटच्या दोन रागांमध्ये 10 फुटांचं अंतर ठेवण्यात येते. तर, एका रांगेतील दोन खांबांमध्ये 7 फुटाचं अतर ठेवलेलं असते. ड्रॅगन फ्रुटची लागवड करताना 5 ते 6 फुट उंचीचे सिमेंटचे खांब त्यावर सिमेंटची किंवा टायरची रिंग बसवावी लागते. तर, सिमेंटच्या खांबाभोवती चारी बाजून ड्रॅगन फ्रुटची रोपं लावली जातात. पाण्याचा निचरा होण्यासाठी खाबांभोवती 3 फुटांचा बेड घ्यावा लागतो. त्यामध्ये शेण खताचा वापर केला जातो. या पिकाला कमी पाणी लागत असल्यानं ड्रीप इरिगेशनचा वापर करावा लागतो. खडकाळ जमिनीवरही हे पीक घेता येते. रासायनिक खतांचा वापर करावा लागत नाही.

महाराष्ट्रात कुठे शेती होते?

राज्यातील अनेक शेतकरी बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या शेतीकडे वळत आहेत. राज्यात 2012 पासून ड्रॅगन फ्रुटची शेती केली जाते. पुणे, सांगली, बीड, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी निवडूंगवर्गीय ड्रॅगन फ्रुटची शेती केली जाते. वडिलोपार्जित शेतीतून अनेक शेतकरी ड्रॅगन शेतीकडे वळत आहेत.

ड्रॅगन फ्रुटची विक्री

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील बाजार समित्यामध्ये विक्री केली जाते. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये ड्रॅगन फ्रुटची विक्री केली जाते. एकदा लागवड केल्यानंतर व्यवस्थित निगा राखल्यास 20 ते 25 वर्ष हे पीक टिकते. पहिल्यांदा लागवडीचा खर्च केल्यानंतर पुन्हा पुढील वर्षांमध्ये लागवड खर्च कमी येतो. महाराष्ट्रातील शेतकरी व्हाईट आणि रेड ड्रॅगन फ्रुटची शेती केली जाते. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि हरयाणा राज्यातील शेतकरी ड्रॅगन फ्रुटकडे वळत आहेत. ड्रॅगन फ्रुटची खाणारा वर्ग तयार होत असल्यानं शेतकऱ्यांनी चांगली संधी आहे.

संबंधित बातम्या:

Special Story | Dragon Fruit चं गुजरातमध्ये नामकरण, महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुट शेतीची स्थिती काय?

ड्रॅगन फ्रुटच्या वाढत्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न? फळाचं चक्क नावच बदललं

(Nanded Madhukar Panchal doing dragon fruit farming)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें