AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar Weather : अवकाळी पावसामुळे लग्न मंडपात असलेल्या वऱ्हाडाची दैना, पै-पाहुण्यांनी डोक्यावर खुर्ची घेतली, मग…

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नंदुरबार तळोद्या तालुक्यात अवकाळी पाऊस (unseasonal rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Nandurbar Weather : अवकाळी पावसामुळे लग्न मंडपात असलेल्या वऱ्हाडाची दैना,  पै-पाहुण्यांनी डोक्यावर खुर्ची घेतली, मग...
nandurbar weather tomorrow Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 14, 2023 | 12:34 PM
Share

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा शहरात (Taloda City) लग्नाचे जेवण सुरू असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मंडपात जेवण करणाऱ्या लोकांची चांगलीचं धांदल उडाली. लग्नाचे आणि जेवणाचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीट व अवकाळी पावसाचे थैमान अधिक असल्यामुळे लग्नासाठी आलेल्या पै-पाहुण्यांना डोक्यावर खुर्ची घेऊन घरी जाण्याची वेळ आल्याचं चित्र पाहायला मिळालं. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात बारगड गढी परिसर व माळी समाज मंगल कार्यालयात गारपीट झाल्याने परिसरात गारवा निर्माण झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नंदुरबार तळोद्या तालुक्यात अवकाळी पाऊस (unseasonal rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

हातातोंडाशी आलेला घास वाया जातोय का ?

हवामान विभागाने सांगितल्यानुसार आज पासून वातावरणात बदल झाल्याने द्राक्षाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाचे बारीक बारीक थेंब येत असल्या कारणामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जातोय का ? अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील पश्चिम भागातील सायखेडा चांदोरी सह परिसरातील गावांना फटका बसला. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे चाळीस ते पन्नास रुपये किलो मिळणारा बाजार भाव उत्पादन खर्च निघणार नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.

ताशी 30 ते 40 किमी वेगाचा सोसाट्याचा वारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 ते 17 मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा,उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेकडून वर्तविण्यात आली आहे.या कालावधीत ताशी 30 ते 40 किमी वेगाचा सोसाट्याचा वारा व मेघगर्जना ही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता मुख्यत्वेकरून जिल्ह्याच्या पूर्वेकडील सह्याद्री घाट माथ्याकडून सुरवात होत अंतर्गत भागातही प्रभाव असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे सद्यस्थितीत उष्म्यात मोठया प्रमाणात वाढ झालेली असल्याने अगोदरच अडचणीत सापडलेला शेतकरी आणखीन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

कांद्याची मातीमोल भाव शेतकरी हवालदिल

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदयाला मातीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदयाला 3 ते 4 रुपये किलो भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कांदा लागवडसाठी लाखो रुपयांचा खर्च लावून देखील कांदयाला मातीमोल भाव मिळत असल्याने आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान