वावरात आलेलं पीक आता पदरात पाडून घेण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता, शेतकऱ्यांसाठी मुहत्वपूर्ण सल्ला

| Updated on: Sep 20, 2021 | 11:06 AM

पिक वावरात आहे ते पदरात पाडून घेण्यासाठीही शेतकऱ्यांना योग्य ते नियोजनच करावे लागणार आहे. कारण मराठवाड्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पीक काढणीची आणि त्यानंतर योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. चला तर मग पाहू कशापध्दतीने पिकाची काढणी करावी आणि त्याचे व्यवस्थापन कसे असावे याबद्दल कृषी तज्ञ रामेश्वर चांडक (बीड) यांनी दिलेली माहिती

वावरात आलेलं पीक आता पदरात पाडून घेण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता, शेतकऱ्यांसाठी मुहत्वपूर्ण सल्ला
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातुर : अखेर अनेक संकटाचा सामना करीत खरिप हंगाम (Kharif) हा अंतिम टप्प्यात आला आहे. मराठवाड्यातील (Marathwada) आठही जिल्ह्यामध्ये खरिपातील सोयाबीन, उडीद, मूगाच्या काढणीला सुरवात झाली आहे. पावसामुळे आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे. परंतू, वावरात आहे ते पदरात पाडून घेण्यासाठीही शेतकऱ्यांना योग्य ते नियोजनच करावे लागणार आहे. कारण मराठवाड्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पीक काढणीची आणि त्यानंतर योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. चला तर मग पाहू कशापध्दतीने पिकाची काढणी करावी आणि त्याचे व्यवस्थापन कसे असावे याबद्दल कृषी तज्ञ रामेश्वर चांडक (बीड) यांनी दिलेली माहिती

हंगामाच्या सुरवातीला पावसाची ओढ त्यानंतर किडीचा प्रादुर्भाव आणि पिके अंतिम टप्प्यात असताना झालेली अतिवृष्टी यामुळे खरिपावर कायम संकट राहिलेले आहे. खरिप हाच उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा हंगाम आहे. यंदा राज्यात सोयाबीन हे 52 हेक्टरावर घेतलेलं पीक आहे. मात्र, या पिकावरील संकटं पाहता उत्पादनात घट तर होणारच आहे पण आता जे वावरात पीक आहे ते शेतकऱ्यांच्या पदरी पडणं गरजेचं आहे. त्याच अनुशंगाने कृषी तज्ञ रामेश्वर चांडक हे म्हणतात…

की खरीपातील सोयाबीन, उडीद, मूग हे काढणीस आले असेल तर शेतकऱ्यांनी लागलीच यंत्राच्या सहाय्याने काढणी करुन घेणं हे गरजेचं आहे. कारण यापुर्वीच पाऊस आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय आता हवामान विभागानेही पावसाचा अंदाज हा वर्तवलेला आहे. त्यामुळे मजुरांकडून किंवा घरच्या घरी काढणी न करता आता हार्वेस्टर किंवा यांत्रिकीकरणातील रीपरचा वापर करून दिवसाकाठी पाच ते सहा एकरातील काढणी यामुले शक्य आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी या अत्याधुनिक बाबींचा वापर काढणी करणे आवश्यक आहे. आता गावशिवारात खरीप पिकांच्या काढणीची लगबग ही सुरु आहे. मजुर एक एक्कर काढणीसाठी चार ते पाच हजार रुपये मजुरी घेतात. शिवाय यामुळे वेळेचाही अपव्यय होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकरणाचाच वापर करून काढणीची कामे उरकून घेणे आवश्यक आहे.

असे करा पिकाचे व्यवस्थापन

पावसाची शक्यता असेल तर शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच त्याचे खळे करणे आवश्यक आहे. कारण काढणीनंतर जर पाऊस झाला आणि सोयाबीन, उडीद हे भिजले तर मालाचा दर्जाही ढातळतो आणि पिकाची उगवणही होण्याचा धोका संभावतो त्यामुळे पावसाचे वातावरण असेल तर शेतकऱ्यांनी काढणी झाली की, लागलीच यंत्राच्या सहाय्याने पिक पदरात पाडून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागले तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी हे गरजेचे आहे.

पावसाने उघडीप दिली तर

सध्यातरी मराठवाड्यात कोरडे वातावरण आहे. अशाच पध्दतीने पावसाची उघडीप राहिली तर पिकाच्या काढणीनंतर वाळवणे गरजंच आहे. काढलेल्या पिकांची एका ठिकाणी साठणूक करुन सुकवले तर पिकाचा दर्जा सुधारणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वातावरणाचा अभ्यास करुन काढणी करणे आवश्यक आहे.

रब्बीतील पेरणीसाठी होईल फायदा

खरीपातील क्षेत्र मोकळे होताच रब्बीतील हरभरा, गहूड ज्वारी याची लागवड केली जाणार आहे. यापुर्वी शेतजमिनीची मशागत आवश्यक आहे. त्यामुळे खरीपातील पिकांचे वेळेत खळे झाले तर रब्बीतील पेरणीही वेळेत होणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वेळेचे नियोजन हे करावेच लागणार आहे. (Need for proper planning for soyabean production, important advice to farmers)

संबंधित बातम्या :

ई-पीक पाहणी : मोबाईलवर केलेली नोंद सातबाऱ्यावरही येणार, 30 सप्टेंबरपर्यंतच मुदत

अफगाणिस्तानातील परस्थितीचा परिणाम केशरच्या दरावर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय ‘लाल सोन्याच्या’ किंमतीत वाढ

फक्त 50 हजार रुपये गुंतवून सुरु करा अळंबीची शेती; महिन्याला कमवाल पाच लाख रुपये