जमिनीवर नाही पाण्यावर भाजीपाला शेती, मत्स्यपालन आणि भाजीच्या संयुक्त शेतीचं भन्नाट तंत्र, अ‍ॅक्वापॉनिक्स नेमकं काय?

महाराष्ट्रातील एका अभियंत्याने अ‍ॅक्वापॉनिक्सद्वारे व्यवसायाचे यशस्वी मॉडेल उभं केले आहे. यासाठी, प्रथम आपल्याला अ‍ॅक्वापॉनिक्स म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.

जमिनीवर नाही पाण्यावर भाजीपाला शेती, मत्स्यपालन आणि भाजीच्या संयुक्त शेतीचं भन्नाट तंत्र, अ‍ॅक्वापॉनिक्स नेमकं काय?
Aquaponic farming

नवी दिल्ली: देश आणि जगातील लोकांच्या वाढत्या गरजा आणि घटणारे स्त्रोत यांच्यातील अंतर पूर्ण करण्यासाठी नव नव्या मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत. अ‍ॅक्वापॉनिक्स देखील त्या नवीन तंत्रज्ञानापैकी एक आहे. हे पारंपारिक शेतीपेक्षा पूर्ण वेगळं आहे. भविष्यातील शेती करण्याचा हा एक अनोखा मार्ग असू शकतो. या तंत्राद्वारे जास्तीत जास्त पाण्याची बचत होते आणि पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं शेती होते. महाराष्ट्रातील एका अभियंत्याने अ‍ॅक्वापॉनिक्सद्वारे व्यवसायाचे यशस्वी मॉडेल उभं केले आहे. यासाठी, प्रथम आपल्याला अ‍ॅक्वापॉनिक्स म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.

अ‍ॅक्वापॉनिक्स म्हणजे काय?

अ‍ॅक्वापॉनिक्स मधील अ‍ॅक्वा म्हणजे पाण्याशी संबंधित किंवा संबंधित काम आणि पोनिक्स म्हणजे हिरव्या भाज्या होय. अ‍ॅक्वापॉनिक्स एक तंत्र आहे ज्यामध्ये मशागतीसाठी कसल्याही जमिनीचा वापर केला जात नाही, पाण्यावर फक्त एक फ्लोटिंग कार्ड ठेवून त्यामध्ये भाज्या वाढतात. या तंत्रात भाजीच्या रोपांना किटकनाशके किंवा कोणतेही खत देण्याची गरज नाही. रोपं स्वतः पाण्यामधून आपल्या गरजेनुसार अन्न घेतात. यामध्ये भाज्यांची रोपं प्रथम एका लहान ट्रेमध्ये तयार करावी लागतात, त्यानंतर फ्लोटिंग बोर्डवर ठेवली जातात.

मस्त्य पालन आणि भाजीपाला शेती संयुक्तपणे

अ‍ॅक्वापॉनिक्स तंत्रज्ञानामध्ये, मासे आणि भाज्यांची एकात्मिक पद्धतीने लागवड केली जाते. माशांपासून निर्माण होणाऱ्या कचर्‍यापासून शेतीसाठी खत उपलब्ध होईल व्यवस्था केली जाते. अ‍ॅक्वापॉनिक्स साठी पॉलिहाऊस असणं आवश्यक आहे. त्याखेरीज दोन मोठ्या गोलाकार टाक्या आवश्यक असतात ज्यामध्ये मत्स्यपालन केलं जातं. प्रत्येक टाकीचे पाणी बाहेर येत राहते आणि दुसर्‍या टँकमध्ये जाते जिथे शुद्ध पाणी पाईपमध्ये जाते आणि नंतर माशांचे पाणी पाईपमधून जाते. यानंतर माशांचे पाणी भाजीपाला रोपांना मिळते. भाजीच्या रोपांचीमुळे त्या पाण्यातून आवश्यक पोषणतत्वे घेतात, त्यानंतर पाणी परत माशांच्या टाकीवर येते.

अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीचे फायदे

अ‍ॅक्वापॉनिक्स पद्धतीमध्ये कमी जागेत जास्त उत्पादन होते. पाण्याच्या वापराबद्दल बोलल्यास, हे तंत्र पारंपारिक शेती आणि ठिबकच्या तुलनेत 95 टक्के पाण्याची बचत करते. या तंत्रात केवळ सेंद्रिय शेती केली जाते. यामुळे पिकांवर इतर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही. अ‍ॅक्वापॉनिक्स तंत्र उभारण्यासा जास्त भांडवलाची आवश्यकता असते.

भारतातील सर्वात मोठे अ‍ॅक्वापॉनिक्स शेती करणारे मयंक गुप्ता हे व्यवसायाने अभियंता आहेत पण आता शेती करत आहेत. हे तंत्र त्यांनी अनेक देशांमध्ये भेटी देऊन शिकले आहे. आता महाराष्ट्रातल्या लोकांना अ‍ॅक्वापॉनिक्समध्ये शेती करण्याच्या पद्धतींबद्दल थोड्या प्रमाणात मार्गदर्शन करतात.

इतर बातम्या:

शेतात कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापराला परवानगी, मार्गदर्शक तत्त्वे नेमकी काय?

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 23 जुलैपर्यंत मुदतवाढ, महाराष्ट्रातील 46 लाखांहून अधिक शेतकरी सहभागी

New methods of farming Aquaponics technique is best latest technology farming without sand what is aquaponics

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI