Akshaya Tritiya 2022 : हापूस आंब्याने साधला अक्षय तृतीयेचा मुहूर्त, आवक वाढली अन् दर घटले

निसर्गाच्या लहरीपणाचा आंबा उत्पादनावर परिणाम झाला असला तरी एप्रिल अखेरला आंबा हा बाजारात दाखल होणार असल्याचा अंदाज आंबा उत्पादक संघाने व्यक्त केला होता. त्यानुसार थोड्या उशिराने का होईना मुख्य शहरातील बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला आहे. कोकणातून गेल्या आठ दिवसांपासून पुणे, मुंबई आणि वाशी मार्केटमध्ये आवक वाढली आहे.

Akshaya Tritiya 2022 : हापूस आंब्याने साधला अक्षय तृतीयेचा मुहूर्त, आवक वाढली अन् दर घटले
तिसऱ्या मोहरातील आंब्याचे उत्पादन वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 10:13 AM

मुंबई : हंगामाच्या सुरवातीपासून (Mango Fruit) आंबा उत्पादकांच्या बाबतीत एकही बाब मनासारखी झालेली नाही. सुरवातीपासूनच  (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम आंबा उत्पादनावर झालेला आहे. अवकाळी पाऊस, वाढलेले ऊन यासारख्या बाबींमुळे यंदा (Mango Sale) आंबा विक्रीसाठी तरी बाजारपेठेत दाखल होतो की नाही अशी अवस्था झाली होती पण अखेर अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत फळांचा राजा बाजारपेठेत दाखल झाला आहे. एवढेच नाहीतर मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना हापूस आंब्याची चव चाखता आली आहे. येथील बाजारपेठेत तब्बल 85 ते 90 हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. अक्षय तृीतेयामुळे आवक वाढणार असा अंदाज व्यापाऱ्यांनी बांधला होता. अखेर तो खरा ठरला असल्याने आंबा खवय्येंनाही अक्षय तृीतीयेच्या मुहूर्तावर चव चाखायला मिळाली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून वाढतेय आवक

निसर्गाच्या लहरीपणाचा आंबा उत्पादनावर परिणाम झाला असला तरी एप्रिल अखेरला आंबा हा बाजारात दाखल होणार असल्याचा अंदाज आंबा उत्पादक संघाने व्यक्त केला होता. त्यानुसार थोड्या उशिराने का होईना मुख्य शहरातील बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला आहे. कोकणातून गेल्या आठ दिवसांपासून पुणे, मुंबई आणि वाशी मार्केटमध्ये आवक वाढली आहे. अक्षय तृीतीयेच्या मुहूर्तावरच दरात घटही झाली आहे. 800 ते 1 हजार वरील हापूसची पेटी 500 ते 600 पर्यंत मिळाल्याने ग्राहकांमध्येही समाधान आहे.

वाढत्या आवकचा दरावर परिणाम

आंबा उत्पादनात घट झाल्यामुळे केवळ मुख्य बाजारपेठेतच आंब्याची आवक सुरु होती. त्यामुळे अक्षय तृीतेयानंतरच सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखायला मिळणार असाच व्यापाऱ्यांचा अंदाज होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादकांना याचा फटका बसला असला तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. 200 ते 300 रुपयांनी पेटीमागे दर घसरले आहेत. आता हेच दर कायम राहतील असा अंदाजही बांधण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

कोकणातूनच सर्वाधिक आवक

उत्पादनात घट झाली तरी आहे त्या मालातूनच अधिकचा फायदा होण्याच्या दृष्टीने उत्पादकांनी गणिते मांडली होती. शिवाय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तरी आंबा विक्री होई या दृष्टीने नियोजनही करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 85 हजार पेट्यांची आवक झाली असून यामध्ये सर्वाधिक आंबा हो कोकणातून दाखल झाला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.