Nanded : जुनं तेच सोनं..! शेती मशागतीचा भार पुन्हा बैलजोडीच्या खांद्यावर, इंधन दरवाढीचा असा हा परिणाम

रब्बी हंगाम संपताच खरिपात उत्पादन वाढावे म्हणून शेती मशागतीची कामे केली जातात. यामध्ये नांगरन, मोगडण, शेत जमिनीची लेवल यासारख्या कामांवर शेतकऱ्यांचा भर असतो. ही सर्व कामे ट्रॅक्टरद्वारेच केली जात आहे. पण आता पुन्हा बैलजोडीच्या खांद्यावरच या कामांचे ओझे पडणार की काय अशी अवस्था झाली आहे.

Nanded : जुनं तेच सोनं..! शेती मशागतीचा भार पुन्हा बैलजोडीच्या खांद्यावर, इंधन दरवाढीचा असा हा परिणाम
इंधन दरावाढीमुळे पुन्हा बैलजोडीने शेती मशागतीची होऊ लागली आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 9:46 AM

नांदेड : शेती व्यवसायात (State-of-the-art machine) अत्याधुनिक यंत्र वापरून उत्पादनवाढीचे आवाहन केले जात असले तरी बांधावरची स्थिती ही वेगळीच आहे. (Fuel) इंधन दरवाढीचा परिणाम शेती व्यवसयारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन अनिश्चित झाले आहे पण शेतीमधील खर्च हा टळलेला नाही.सध्या (Rabi Season) रब्बी हंगाम संपल्यानंतर खरीप हंगामपुर्व मशागतीचे कामे करावी लागणार आहेत. दरवर्षी हा कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात होती पण यंदा इंधन दरवाढीचा परिणाम मशागत खर्चावरही झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा बैलजोडीकडे मार्गक्रमण करीत आहे. पण आठवडी बाजारात बैलजोडीची किंमतही लाखापेक्षा अधिकच असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

रब्बीनंतर मशागतीची कामे

रब्बी हंगाम संपताच खरिपात उत्पादन वाढावे म्हणून शेती मशागतीची कामे केली जातात. यामध्ये नांगरन, मोगडण, शेत जमिनीची लेवल यासारख्या कामांवर शेतकऱ्यांचा भर असतो. ही सर्व कामे ट्रॅक्टरद्वारेच केली जात आहे. पण आता पुन्हा बैलजोडीच्या खांद्यावरच या कामांचे ओझे पडणार की काय अशी अवस्था झाली आहे. कारण इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या मशागत कामाचेही दरवाढ झाली आहे. गावस्तरावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे पण वाढत्या दरामुळे शेतकरी आता बैलजोडीला झुंपूनच शेती कामे करण्यावर भर देत आहे.

असे आहेत ट्रॅक्टरने मशागतीचे दर

शेती मशागतीमध्ये यांत्रिकिकरण वाढले असून त्यामुळे वेळेची बचत होत असली तरी शेतकऱ्यांचा खर्च मात्र दुपटीने वाढला आहे. कारण सध्या शेतजमिनीची नांगरट करण्यासाठी एकरी 2 हजार रुपये तर रोटरण्यासाठीही 2 हजार रुपये मोजावेल लागत आहेत. खुरटणी 1 हजार रुपये, पेरणी 1 हजार 500 रुपये, पालकुट्टी 2 हजार 500 रुपये तर हळद काढणीसाठी एकरी 2 हजार रुपये मोजावे लागत आहेत. प्रत्येक कामामध्ये दर वाढले आहेत.

हे सुद्धा वाचा

बैल जोडीचे दरही लाखाच्या पार

कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर आता गावखेड्यामध्ये जनावरांचे आठवडी बाजार सुरु झाले आहेत. त्यामुळे बाजारात जनावरांची संख्या वाढली असली तरी त्या तुलनेत दरही वाढले आहेत. बैलजोडी घ्यावयाची म्हणले तर शेतकऱ्याला 1 लाख रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय खिलार आणि जातिवंत बैल असल्यास वेगळेच दर अशी अवस्था आहे. गेल्या दोन वर्षापासून जनावरांचे बाजार बंद होते. पण आता सुरु झाल्याने जनावरांची संख्या तर वाढली आहे पण खरेदीदारही वाढले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.