Onion Price: कांदा महाग होणार का? मागील वर्षीच्या तुलनेत दर दुप्पट

| Updated on: May 10, 2021 | 9:30 PM

रब्बी हंगामातील कांदा बाजारात येण्यास सुरुवात झालीय. सध्या कांद्याचे दर (Onion Price) किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो सुरु आहेत.

Onion Price: कांदा महाग होणार का? मागील वर्षीच्या तुलनेत दर दुप्पट
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : रब्बी हंगामातील कांदा बाजारात येण्यास सुरुवात झालीय. सध्या कांद्याचे दर (Onion Price) किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो सुरु आहेत. देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात सध्या कांद्याचे दर 1100 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत पोहचलेत. मागील वर्षी याच काळात कांद्याचे दर सरासरी 400 ते 600 रुपये क्विंटल इतके होते. कांद्याचं घटलेलं उत्पादन हेच यामागील कारण असल्याचं बोललं जातंय. कांद्याचे दर वाढले असले तरी अजूनही या दरात शेतकऱ्यांना फार नफा होत नसल्याचं दिसत आहे. सध्या कांदा उत्पादनाचा खर्च जवळपास 16 रुपये किलो आहे (Onion price double as compare to previous year Maharashtra Nashik rain effect).

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोले यांनी यावर्षी अनियमित वीज, उशिरा लागवड, पाऊस आणि गारा यांच्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच कांदा दरात वाढ झाल्याचं दिसत आहे. दरवर्षी सरासरी 16 टन प्रति एकर प्रमाणे कांदा उत्पादन होतं. यंदा मात्र, प्रति एकर कांदा उत्पादन 10 ते 13 टनापर्यंत घटलंय. त्यामुळे 16 रुपये प्रतिकिलो खर्च येत असताना 11 ते 15 रुपये प्रति किलो सरासरी दर शेतकऱ्यांसाठी कमीच मानला जातोय.

कांद्याचा उत्पादन खर्च किती?

दिघोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने 2017 मध्ये कांदा उत्पादनासाठी प्रति किलो 9.34 रुपये खर्च येत असल्याचं सांगितलं होतं. 4 वर्षांनी हा उत्पादन खर्च वाढून 15 ते 16 रुपये किलोपर्यंत वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आजही नुकसान होतंय. शेतकऱ्याला न त्याच्या मेहनतीचा पैसा मिळतोय, न जमिनीचा मोबदला मिळत आहे. महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची सर्वाधिक शेती होते. नेमकं याच भागात यंदा कांदा उत्पादन घटलंय.

भारतात कांदा उत्पादन कुठे किती?

  • महाराष्ट्र, तेलंगना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान हे राज्यं कांद्याचे मोठे उत्पादक राज्यं आहेत.
  • देशात कांद्याचं वार्षिक उत्पादन सरासरी 2.25 ते 2.50 कोटी मेट्रिक टन इतकं आहे.

हेही वाचा :

आशिया खंडातील अग्रेसर लासलगाव बाजार समिती तब्बल 7 दिवस बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प, शेतकरी चिंतेत

मुंबई एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण, बटाटा आणि लसूणही गडगडला, वाचा आजचे दर

Onion Price: कांद्याचे भाव वाढण्याचं कारण काय? महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठांची स्थिती काय?

व्हिडीओ पाहा :

Onion price double as compare to previous year Maharashtra Nashik rain effect