AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM-kisan: किसान सन्मान योजनेचा आठव्या हप्त्याची रक्कम होळीनंतर मिळणार, 11 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे. PM Kisan Samman scheme

PM-kisan: किसान सन्मान योजनेचा आठव्या हप्त्याची रक्कम होळीनंतर मिळणार, 11 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा
प्रातिनिधिक फोटो
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 29, 2021 | 3:13 PM
Share

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून होळी सण झाल्यानंतर एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे. सरकारनं निर्धारित केलेल्या 14.5 कोटींच्या संख्येसाठी 2.74 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी होणं अद्याप बाकी आहे. केंद्र सरकारकडून 11.76 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठवले जाण्याची शक्यता आहे. (PM Kisan Samman scheme 8th instalment credited after holi know how many farmers gate advantage of this scheme)

11.76 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. केंद्र सरकारचा 14.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 11.76 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झालीय.

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी सुरु

पीएम किसान सन्मान योजनेमध्ये नोंदणी केली नसल्यास नोंदणी करण्याची संधी आहे. देशभरातील 2.74 कोटी शेतकरी नोंदणी करु शकतात. नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करता येईल. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक वर्षात 6 हजार रुपये पाठवले जातात. शेतकऱ्यांनी जर 31 मार्चपूर्वी नोंदणी केली आणि त्यांचा अर्ज स्वीकारला गेल्यास त्यांना मार्च महिन्याचे 2000 आणि एप्रिल महिन्याचे 2000 असे चार हजार मिळू शकतात.

जम्मू काश्मीर, लडाख, मेघालय, आसामचे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणार असतील तर त्यांच्या राज्य सरकारडून शेतकऱ्यांचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं, असणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डच्या माहितीमध्ये विसंगती आढळून आली त्यांच्याकडून पैसे परत घेण्यात आले आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, यूपी आणि बिहारमधील शेतकऱ्यांच्या आधार कार्डची पडताळणी होणार आहे. जर तुमच्या आधार कार्डवरील माहितीमध्ये चूक असल्यास ती 31 मार्चपूर्वी दुरुस्त करुन घ्या. राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये तुम्हाला आधार कार्डमधील माहिती अपडेट करुन मिळेल.

ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

स्टेप 1: पीएम-किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in)वर भेट द्या. स्टेप 2: तिथे Farmer Corner वर क्लिक करा स्टेप 3: पुढे NEW FARMER REGISTRATIONवर क्लिक करा. स्टेप 4: यानंतर पुढील पेज ओपन होईल तिथे आधार कार्ड आणि कॅप्चा टाकून पडताळणी करा स्टेप 5 : यानंतर पुढे जा वर क्लिक करा स्टेप 6: पुढे अर्ज ओपन होईल त्यातील माहिती भरा स्टेप 7: अर्जातील संपूर्ण माहिती बरोबर भरा आणि नोंदणी करा.

संबंधित बातम्या:

“सपासप असा कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर नसून आपल्याच छातीवर होत आहेत”

PM-kisan: किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम एप्रिलमध्ये मिळणार, आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ?

(PM Kisan Samman scheme 8th instalment credited after holi know how many farmers gate advantage of this scheme)

Follow Us
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला