PM Kisan | पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्ता लवकरच, तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी पाहिली का?

पीएम किसान योजनेअंतर्गत आपल्या गावातील किती शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो हे तुम्ही तपासलं आहे का? PM Kisan Samman village list

PM Kisan | पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्ता लवकरच, तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी पाहिली का?
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 12:25 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम 10 एप्रिलाच्या सुमारास पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत सात हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जाणार आहेत. मात्र, आपल्या गावातील किती शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो हे तुम्ही तपासलं आहे का? (PM Kisan Samman scheme 8th instalment soon know how to check village list )

तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांचा पीएम किसानमध्ये समावेश

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या गावाची पूर्ण यादी पाहू शकता. त्याठिकाणी तुम्हाला गावातील शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध होईल. तिथं तुम्ही गावातील किती शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला. कुणाला किती हप्त्यांमध्ये पैसे मिळाले. याची माहिती मिळू शकते.

गावातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला कसं पाहायचं?

सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. तिथे Payment Success टॅब खाली भारताचा नकाशा पाहायला मिळेल. तिथे खाली Dashboard लिहिलं असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर नवं पेज ओपन होईल. तिथे Village Dashboard या पेजवर क्लिक करा त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. यानंतर शो बटनवर क्लिक करा. यानंतर माहिती येईल. तिथे आपण ज्या शेतकऱ्याची माहिती पाहायची असेल ती पाहता येईल.

11.66 कोटी शेतकऱ्यांना फायदा

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेनुसार 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत. आठव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही दुरुस्ती असेल तर करुन घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात. पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै आणि तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान जारी केला जातो. पीएम किसान सन्मान योजनेसाठी देशातील 11.66 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचणी असल्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. जर सर्व शेतकऱ्यांचं रेकॉर्ड दुरुस्त केले तर सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात.

संबंधित बातम्या:

दरवर्षी 75 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात; जाणून घ्या मोदींची विशेष योजना

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून 2000 रुपये जमा होणार, यादीतील तुमचं नाव आजच चेक करा!

(PM Kisan Samman scheme 8th instalment soon know how to check village list )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.