PM Kisan Yojana : 21 वा हप्ता कधी येणार? संपली प्रतिक्षा, बिहार निवडणुकीपूर्वी अपडेट कळली का?

21st Installment : शेतकरी किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी येणार? अशी चर्चा सुरू आहे. या महिन्यात बिहार निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच सन्माननिधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, काय आहे अपडेट?

PM Kisan Yojana : 21 वा हप्ता कधी येणार? संपली प्रतिक्षा, बिहार निवडणुकीपूर्वी अपडेट कळली का?
पीएम किसान योजना
Updated on: Nov 01, 2025 | 4:46 PM

PM Kisan Yojana 21st Installment : शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांमध्ये प्रतिक्षा आहे. या महिन्यात बिहार निवडणुकासाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे. त्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात DBT अंतर्गत थेट पैसा जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील. उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या खात्यात एक महिन्यापूर्वीच केंद्र सरकारने 21 वा हप्ता जमा केला आहे. तिथल्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यावेळी मदत करण्यात आली.

PM Kisan Yojana चा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळतो. या योजनेतंर्गत वर्षभरात शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. 2-2-2 रुपयांप्रमाणे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 वा हप्ता जमा केला. या राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने या राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली आहे.

31.01 लाख शेतकऱ्यांना फटका?

राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील जवळपास 31.01 लाख शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. पती आणि पत्नी दोन्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तर नियमानुसार, एक कुटुंबातील पती अथवा पत्नी यातील एकालाच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनाचा लाभ घेता येतो. त्यामुळे यातील अर्धे लाभार्थी बाद होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता पात्र शेतकर्‍यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.

येथे शेतकऱ्यांना करता येणार तक्रार

ई-केवायसी पूर्ण झाले असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येणार नाही. पण त्यासाठी बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. PM Kisan हेल्पलाईन 155261 वा 011-24300606 येथे कॉल करावा.