PM Kisan Scheme: तब्बल 42 लाख अपात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ, वसुलीची प्रक्रिया सुरु, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी पीएम किसान योजनेचा 42 लाख अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याची माहिती दिली आहे. पीएम किसान योजना सुरु झाल्यापासून जवळपास 2900 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांच्या  खात्यावर जमा झाल्याचं तोमर म्हणाले.

PM Kisan Scheme: तब्बल 42 लाख अपात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ, वसुलीची प्रक्रिया सुरु,  केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
पंतप्रधान किसान सन्मान योजना

नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी पीएम किसान योजनेचा 42 लाख अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याची माहिती दिली आहे. पीएम किसान योजना सुरु झाल्यापासून जवळपास 2900 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांच्या  खात्यावर जमा झाल्याचं तोमर म्हणाले. मात्र, अपात्र शेतकऱ्यांकडून संबंधित रक्कम परत घेतली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत अतारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही बाब समोर आली आहे. लोकसभेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

अपात्र शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या आसामामध्ये

पीएम किसान योजनेच्या अपात्र शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या ही आसामा, तामिळनाडू, छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमध्ये असल्याचं समोर आले आहे. पीएम किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यार 6 हजार रुपये दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर 24 फेब्रुवारी 2019 रोजी वर्ग करण्यात आला होता. तर पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता मे मिहन्यात जारी करण्यात आला आहे. मे महिन्यात 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 हजार कोटी रुपये वर्ग कण्यात आले आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सरकारनं 1.15 लाख कोटी रुपये वर्ग केले आहेत.

नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममध्ये 8 लाख 35 हजार 268 अपात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतळ्याचं समोर आलं आहे. तर, तामिळनाडूत 7 लाख 22 हजार 271 अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. छत्तीसगडमध्ये 58 हजार 289 अपात्र लाभार्थी असल्याचं सोर आलं आहे. तर पंजाबमध्ये 562256 इतके अपात्र लाभार्थी समोर आले आहेत. तर बिहारमध्ये 52 हजार 178 अपात्र लाभार्थी असल्याचं समोर आलंय.

अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेण्यास सुरुवात

केंद्र सरकारनं राज्य सरकारांना अपात्र लाभार्थी शोधून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार देशभरात पीएम किसान योजनेचे पैसे परत घेण्याचं काम सुरु आहे. आसामच्या अपात्र लाभार्थ्यांकडून 554 कोटी, उत्तर प्रदेशातील 258 कोटी, बिहारमधून 425 कोटी आणि पंजाबच्या अपात्र लाभार्थ्यांकडून 437 कोटी रुपये परत घेण्याचे आदेश आहेत.

पीएम किसानचा लाभ कुणाला मिळत नाही

पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत. याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही. आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल.

इतर बातम्या:

PM Kisan: 10.90 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 37 हजार कोटी वर्ग, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही? एक फोनवर 2 हजार मिळवा

PM Kisan Scheme Agriculture Minister Narendra Tomar said 4.2 million ineligible people take advantage of scheme

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI