AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही? एक फोनवर 2 हजार मिळवा

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. PM Kisan Samman Scheme

PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही? एक फोनवर  2 हजार मिळवा
पीएम किसान योजना
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 10:38 AM
Share

PM Kisan नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 मे रोजी योजनेचा आठवा हप्ता जारी केला आहे. योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. पीएम किसानच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जात आहेत. काही शेतकऱ्यांना अद्याप पैसे आले नाहीत त्यांनी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर कॉल केल्यास कागदपत्रातील त्रुटी दूर केल्यानंतर 2 हजार रुपये मिळतील. (PM Kisan Samman Nidhi Scheme 8 installment delayed farmers can call helpline number for resolve queries in documents)

आठव्या हप्त्याचे 2 हजार कसे मिळणार?

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 8 व्या हप्त्यासाठी नोंदणी केली असेल आणि अद्याप पैसे मिळाले नसतील तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर फोन करुन माहिती मिळवू शकता. हेल्पलाईनवर संपर्क करुन जी अडचण असेल ती दूर केल्यास 2 हजार रुपये तुम्हाला मिळतील.

  1. पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
  2. पीएम किसान हेल्‍पलाईन नंबर:155261
  3. पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011-23381092, 23382401
  4. पीएम किसान स्‍कीमचा नवीन हेल्‍पलाईन नंबर: 011-24300606, 0120-6025109
  5. अधिकृत ई-मेल: pmkisan-ict@gov.in

मोदी सरकारची यशस्वी योजना

मोदी सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेचे नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी अशी मागणी केली आहे.

पीएम किसान योजनेचं तुमचं रेकॉर्ड कसं तपासणार?

स्टेप 1: सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. स्टेप 2:तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल. स्टेप 3:होमपेजवर किसान कॉर्नवर जा. स्टेप 4:जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल. स्टेप 5: फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. स्टेप 6: पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल. स्टेप 7:ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.

संबंधित बातम्या:

Weather alert: येत्या दोन-तीन तासांमध्ये मुंबई आणि उपनगरात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता

PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेचे 30 महिने पूर्ण, 9 व्या हप्त्याची तयारी सुरु

(PM Kisan Samman Nidhi Scheme 8 installment delayed farmers can call helpline number for resolve queries in documents)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.