शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपये येणार, यादीतील नाव असे तपासा

1 ऑगस्टनंतर 11 कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची तयारी सुरू आहे. या योजनेंतर्गत केवळ ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपये येणार, यादीतील नाव असे तपासा
महिला शेतकरी
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 11:34 AM

नवी दिल्लीः पीएम किसान योजनेच्या (PM Kisan scheme) 9 व्या हप्त्यासाठी 2000 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट-नोव्हेंबरचा पैसा लवकरच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात येणार आहे. 1 ऑगस्टनंतर 11 कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची तयारी सुरू आहे. या योजनेंतर्गत केवळ ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. जर कोणी आयकर (Income Tax) भरत असेल आणि त्याच्या खात्यात पैसे आले, तर त्याला ते परत करावे लागतील.

शेतकर्‍यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये पाठवते

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये पाठवते. जेणेकरून ते सहजपणे शेती करू शकतील. आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली असेल आणि आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहे की नाही हे जाणून घेऊ इच्छित असल्यास काळजी करण्याची गरज नाही. आता आपण हे सहजपणे जाणू शकता.

आपले नाव असे तपासा

>> पंतप्रधान किसान योजना https://pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. >> त्याच्या होमपेजवरील Farmers Cornerच्या पर्यायावर क्लिक करा. >> या कोपऱ्यात आपल्याला लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. >> यानंतर डॅशबोर्डवर क्लिक करून राज्य, जिल्हा, तहसील, गट आणि गाव निवडा. >> मग गेट रिपोर्टवर क्लिक करा. गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आपल्या समोर उघडेल. >> यामध्ये आपण हे पाहू शकता की गावातील कोणत्या व्यक्तीला पैसे मिळत आहेत आणि कोणाला नाही. >> अर्जानंतर पैसे का मिळत नाहीत, त्याचा उल्लेखही या पानावर केला जाणार

याप्रमाणे स्टेटस जाणून घ्या, नोंदणी करा

>> फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) या वेबसाईटच्या लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा. >> उघडलेल्या पृष्ठामध्ये आपला मोबाईल नंबर, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून आपण स्थिती जाणून घेऊ शकता. >> आपण घरी बसून या योजनेसाठी नोंदणी करू शकता, यासाठी आपल्याकडे आपल्या महसुली नोंदी असणे आवश्यक आहे. उदा. सातबारा, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक.

कोणाला फायदा होणार नाही?

>> जे शेतकरी भूतपूर्व किंवा विद्यमान संवैधानिकपद धारक आहेत, विद्यमान किंवा माजी मंत्री आहेत. >> नगराध्यक्ष किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा आणि राज्यसभा खासदार >> या लोकांना योजनेतून बाहेर केले जाईल, मग भलेही ते शेती करू देत. >> केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकारी यातून बाहेर राहतील. >> मागील आर्थिक वर्षात ज्यांनी आयकर भरला आहे, त्यांना लाभ मिळणार नाही. >> ज्या शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते, त्यांनाही फायदा होत नाही. >> व्यावसायिक, डॉक्टर, अभियंता, सीए, वकील आणि आर्किटेक्ट या योजनेबाहेर असतील.

संबंधित बातम्या

25 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा 50 हजारांपर्यंत कमवा

आपली संपूर्ण माहिती पॅन कार्डमध्ये दडलेली असते; जाणून घ्या, किती कामाचे दस्तावेज?

PM Kisan scheme Rs 2000 will be credited to the account of the farmer soon

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.