
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील 21 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पण आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. आता तुमच्या खात्यात पैसे येती की नाही, याची चितंता वाढली आहे. तांत्रिक गडबडीवर आता सरकारने लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यामुळे आतापर्यंत वंचित शेतकऱ्यांना चेहरा खुलला आहे. तर काही शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू शकतो. शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो का? काय आहे ही अपडेट…
PM-Kisan Yojana
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM-Kisan Yojana) 21 वा हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या हप्त्यावेळी तांत्रिक बिघाड झाला होता. केंद्र सरकारने बँका आणि राज्य सरकारला यावेळी कडक ताकीद दिली आहे. आधार लिकिंग, KYC आणि चुकीची बँक माहिती सारख्या अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळाले नाही. पण यावेळी अशा चुका होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
वर्षाला 6000 रुपये
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरुवात झाली. या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो. या योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला थेट 6000 रुपये जमा करण्यात येतात. ही मदत तीन टप्प्यात देण्यात येते. 2000 रुपयांप्रमाणे चार महिन्याच्या अंतरावर ही रक्कम जमा करण्यात येते. आता पर्यंत सरकारने 20 हप्त्यांमध्ये जवळपास 3.90 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे.
बँका आणि राज्य सरकारला थेट निर्देश
केंद्र सरकारने सर्व बँका आणि राज्य सरकारला या योजनेविषयीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अनेक गावात या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यसाठी शिबीर सुरू करण्यात येणार आहे. बँक अधिकारी शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया, खात्यासंदर्भातील माहिती, आधार याविषयीची माहिती अपडेट करणार आहे. तर पंचायत स्तरावर सुद्धा महत्त्वाचा बदल होणार आहे. त्यामुळे कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे. तर या शिबीरामुळे बोगस शेतकऱ्यांची माहिती समोर येणार आहे.