नुकसानीचा पाऊस, 300 जनावरांचा मृत्यू, फळबागाही आडव्या

खरीप हंगामाच्या (Kharip Hangam) अंतिम टप्यात पश्चिम महाराष्ट्र (Maharashtra) आणि मराठाड्यात (Marathwada) झालेल्या पावसामुळे खरीप पीकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील 90 जनावरांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जनावरे ही बेपत्ता आहेत. राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे सुरू केले आहेत.

नुकसानीचा पाऊस, 300 जनावरांचा मृत्यू, फळबागाही आडव्या
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई : खरीप हंगामाच्या (Kharip Hangam) अंतिम टप्यात पश्चिम महाराष्ट्र (Maharashtra) आणि मराठाड्यात (Marathwada) झालेल्या पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक ऐन पदरात पडण्याच्या प्रसंगी पावसाने हाहाकार केल्याने केवळ पीकेच नाही तर शेत जमिनही खरबडून गेली आहे. नगर जिल्ह्यातील 90 जनावरांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जनावरे ही बेपत्ता आहेत. राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे सुरू केले आहेत. पण केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. (Rain Damaged kharip crop,300 animals killed, orchards horizontal)

मध्यंतरी तीन आठवडे पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे खरीपातील पीके वाया जाणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. सलग चार दिवस पाऊस बरसल्याने खरीपातील उडीद, मूग पीकाचे नुकसान झाले आहे तर फळबागाही आडव्या झाल्याचे चित्र बीड, अहमदनगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील सर्वच मंडळास सरासरीच्या तुलनेत पाचपट अधिक पाऊस झाला आहे. शिवाय देवगाव, रतडगाय, पोखर्डी, जेऊर, डोंगरगण या गावातील घरांचीही पडझड झाली आहे. शेती आणि पीकाचेच नाही तर जनानरेही दगावलेली आहेत. सर्वाधिक फटका हा शेवगाव येथील शेतकऱ्यांचे बसलेला आहे. याच तालुक्यातील 81 जनावरे ही बेपत्ता असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातील कडा, आष्टी परीसरात पपईच्या फळबागा ह्या उध्वस्त झाल्या आहेत. पावसामुळे कोट्यावधीचे नुकसान झाले असून सरकारने तातडीने मदत करण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कांदे वाहून गेले अन् पपई पाण्यात पोहतेय साहेब

पावसाविना खरीपातली नगदी पीकं वाया गेली तर राहिलं-साहिल्यां फळबागा पावसाने हिरावून घेतल्या…सांगा जगाचयं कस? असा खडा सवालच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समोर कडा येथील शेतकऱ्याने उपस्थित केला. केवळ पाहणी नको तर प्रत्यक्ष मदत त्वरीत देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर नगर जिल्ह्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे, डॅा. सुजय विखे-पाटील, आ. मोनिका जावळे, शिवाजीराव काकडे, हर्षदा काकडे, जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भोसले यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.

शेतकऱ्यांना दुहेरी फटका

हात ऊसने पैसे घेऊन शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. परंतू, अगोदर पाऊस नसल्याने खरीपातील सोयाबीन, उडीद या पीकांचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम उत्पादनावर तर होणारच आहे शिवाय फळबागांचीही पडझड झाली आहे. त्यामुळे पदरी ऊत्पन्न नाहीच परंतू शेतकऱ्यांना खरीपातून झळच बसलेली आहे.

काळजी करूच नका : पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील आष्टी, कडा परिसरात पावसामुळे खरीपासह फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीकांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नकात नुकसान भरपाई दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे सांगितले. (Rain Damaged kharip crop,300 animals killed, orchards horizontal)

संबंधित बातम्या : 

औरंगाबादेत पावसाचा जोर ओसरला, ऊन-सावलीचा खेळ, 6 सप्टेंबरनंतर दणक्यात बरसणार

कांद्याचा – वांदाच, आवक घटूनही दर घसरलेलेच

मिरची नेमकी कुणाला झोंबली? मिरचीला पीक विम्यातून वगळल्याने शेतकरी हतबल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI