Banana Market : उत्पादनात घट, दरात तेजी, 10 वर्षात घडलं नाही ते यंदा केळी उत्पादकांच्या पदरात पडलं

जळगाव जिल्ह्यातील रावेर बाजार समितीमध्ये सध्या केळी पिकाचा बोलबाला सुरु आहे. हंगामाच्या सुरवातीला व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये दरावरून अनेक मतभेद झाले होते. पण आता चित्र बदलले आहे.रावेर बाजार समितीमध्ये 15 जूनला 1 हजार 670, 16 जूनला 1 हजार 720, 17 जूनला 1 हजार 750 तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी 50 रुपयांनी दर वाढल्याने केळी 1 हजार 800 रुपये क्विंटलवर गेली आहे.

Banana Market : उत्पादनात घट, दरात तेजी, 10 वर्षात घडलं नाही ते यंदा केळी उत्पादकांच्या पदरात पडलं
केळीचे दर अचानक घसरल्याने केळी उत्पादक अडचणीत आहेत.
Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे

|

Jun 19, 2022 | 1:14 PM

जळगाव : उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून भरुन निघाली तरी शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होते. गतवर्षी कापूस पिकातून याचा अनुभव आला तर आता  (Banana Crop) केळी उत्पादकांच्याबाबतीत असेच होताना पाहवयास मिळत आहे. (Jalgaon) जळगाव जिलह्यातील रावेर तालुक्यात केळीचे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीला 300 ते 400 क्विंटलवर असलेली केळी आता 1 हजार 800 रुपयांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अधिकची मागणी असतानाही तोकडा पुरवठा केला जात आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे (Banana Production) केळी उत्पादनात कमालीची घट झाली आहे. केवळ जळगावातच नाहीतर उत्तर भारतामध्येही हीच स्थिती ओढावल्याने आता दर गगणाला भिडले आहेत.

दिवसागणिस वाढत आहेत केळीचे दर

जळगाव जिल्ह्यातील रावेर बाजार समितीमध्ये सध्या केळी पिकाचा बोलबाला सुरु आहे. हंगामाच्या सुरवातीला व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये दरावरून अनेक मतभेद झाले होते. पण आता चित्र बदलले आहे.रावेर बाजार समितीमध्ये 15 जूनला 1 हजार 670, 16 जूनला 1 हजार 720, 17 जूनला 1 हजार 750 तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी 50 रुपयांनी दर वाढल्याने केळी 1 हजार 800 रुपये क्विंटलवर गेली आहे. दरात मोठी वाढ झाली असली तरी यापूर्वी अवकाळी पावसामुळे आणि आता पावसाळ्याच्या तोंडावर बागांचे मोठे नुकसान झाले होते.

कापणी मर्यादित मागणी मुबलक

केळी हे बारमाही बाजारपेठेत उपलब्ध असलेले फळपिक आहे. सध्या आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असताना केळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. विशेषत: उत्तर भारतामधून मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही उत्पादक मात्र मर्यादितच कापणी करीत. भविष्यात अधिकचा दर मिळेल या आशेने कापणीला आलेल्या केळीवरच शेतकऱ्यांचे लक्ष आहे. मात्र, मागणी अशीच राहिली तर भविष्यात दरवाढ निश्चित मानली जात आहे.

हे सुद्धा वाचा

10 वर्षातील सर्वाधिक दर

केळी हे फळपिक दरावरुन कायम चर्चेत राहिलेले आहे. हंगामाच्या सुरवातीला दराबाबात व्यापाऱ्यांची मनमानी सुरु होती. द्राक्षाप्रमाणेच केळीचेही दर निश्चित कऱण्यात येणार होते. पण व्यापाऱ्यांनी जागोजागी शेतकऱ्यांची अडवणूक केली होती. त्यामुळे ते शक्य झाले नाही. आता परस्थिती बदलली आहे. व्यापारी केळी खरेदीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. गेल्या 10 वर्षात जो दर केळीला मिळाला नाही तो आता शेतकऱ्यांच्या पदरात पडताना पाहवयास मिळत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें