Cotton Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला विक्रमी दर, नेमका फायदा कुणाला?

| Updated on: Mar 16, 2022 | 3:36 PM

हंगामाची सुरवात 6 हजार रुपये क्विंटलपासून सुरु झालेला कापूस आता अंतिम टप्प्यात 11 हजार रुपयांपर्यंत पोहचलेला आहे. उत्पादनातील घट आणि वाढती मागणी यामुळे गेल्या 50 वर्षात जे झाले नाही ते यंदा कापसाच्या दराबाबत झाले आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात विदर्भातील खरेदी केंद्रावर सर्वाधिक दर मिळत आहे. पण याचा नेमका फायदा शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे. कमी दरात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आता काही दिवसांमध्येच दर दुप्पट झाले आहेत.

Cotton Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला विक्रमी दर, नेमका फायदा कुणाला?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नागपूर : हंगामाची सुरवात 6 हजार रुपये क्विंटलपासून सुरु झालेला (Cotton) कापूस आता अंतिम टप्प्यात 11 हजार रुपयांपर्यंत पोहचलेला आहे. उत्पादनातील घट आणि वाढती मागणी यामुळे गेल्या 50 वर्षात जे झाले नाही ते यंदा कापसाच्या दराबाबत झाले आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात (Vidarbh) विदर्भातील खरेदी केंद्रावर सर्वाधिक दर मिळत आहे. पण याचा नेमका फायदा शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे. कमी दरात शेतकऱ्यांनी (Cotton Sell) कापसाची विक्री केली आता काही दिवसांमध्येच दर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला व्यापारी घरोघरी येऊन कापसाची खरेदी का करीत होते हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले असेल. वर्ध्यातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सेलू येथे तब्बल 10 हजार 900 प्रतिक्विंटल दर मिळाला होता. आता मोजक्याच शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. इतरांना मात्र, फरदडचा आधार घ्यावा लागत आहे.

उत्पादनात घट, दरात वाढ

विदर्भासह कापूस हे मराठावड्यातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक आहे. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीमुळे तोडणीला आलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचाच परिणाम संबंध हंगामातील दरावर राहिलेला आहे. बाजारपेठेत आवक घटल्यामुळे 6 हजारावरील दर आता जवळपास 11 हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचलेले आहेत. उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरामुळे भरुन निघालेली आहे. मात्र, असे असले तरी साठवणूकीतल्या सोयाबीनची विक्री झाल्यानंतर दर अधिक वाढत आहेत. त्यामुळे अधिकचा फायदा हा व्यापाऱ्यांचाच होत असल्याचे चित्र आहे.

फरदडचाही शेतकऱ्यांनी घेतला आधार

नाही म्हणत..म्हणत शेतकऱ्यांनी फरदड कापासाचे उत्पादन नुकसानीचे असतानाही घेतलेच. बाजारपेठेतील वाढते दर आणि मुबलक पाणीसाठा यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी होताच पुन्हा कापसाला पाणी देऊन पीक घेतले आहे. फरदडमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव तर वाढतोच पण शेतजमिनही नापिक होते. हे सर्व माहित असूनहा हंगामाच्या अंतिम टप्प्यातील दर पाहून शेतकऱ्यांनी आपला निर्णय बदलला आहे. त्यामुळेच विदर्भात अजूनही कापूस उभाच दिसत आहे.

4 दिवसांत 700 रुपयांनी वाढ

गेल्या चार दिवसांपासून कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 10 मार्चपर्यंत खरेदी केंद्रावर कापसाला 10 हजार 200 असा दर होता. मात्र, दिवसागणीस कापसाच्या दरात वाढ होत आहे. 15 मार्च रोजी कापसाचे दर हे 10 हजार 900 रुपयांपर्यंत पोहचले होते. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मागणी असल्यानेच ही दरवाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी फरदडचे उत्पादन घेतले तरी ते अल्प स्वरुपात असणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे वाढले दर, सोयाबीनचे काय चित्र?

Agricultural : शेतीला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, शेतकरी आत्मनिर्भरतेसाठी सरकारचे काय आहे धोरण?

काय सांगता ? 11 वर्षापूर्वी मयत झालेला व्यक्ती थेट रोजगार हमी योजनेवर, अमरावतीमध्ये अनियमितेची ‘हमी’