काय सांगता ? 11 वर्षापूर्वी मयत झालेला व्यक्ती थेट रोजगार हमी योजनेवर, अमरावतीमध्ये अनियमितेची ‘हमी’

काय सांगता ? 11 वर्षापूर्वी मयत झालेला व्यक्ती थेट रोजगार हमी योजनेवर, अमरावतीमध्ये अनियमितेची 'हमी'
येवदा ग्रामपंचायत कार्यालय

राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी आणि मजूरांचे हीत समोर ठेऊन एक ना अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, स्थानिक पातळीवर त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी होते हे नव्याने सांगायला नको. मात्र, अमरावती जिल्ह्यातील येवदा येथे घडलेला प्रकार हा चक्रावून टाकणारा आहे. योजनेतील पैसे लाटण्यासाठी चक्क 11 वर्षापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला जिवंत दाखवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: राजेंद्र खराडे

Mar 16, 2022 | 12:43 PM

अमरावती : (State Government) राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी आणि मजूरांचे हीत समोर ठेऊन एक ना अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, स्थानिक पातळीवर त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी होते हे नव्याने सांगायला नको. मात्र, (Amaravti District) अमरावती जिल्ह्यातील येवदा येथे घडलेला प्रकार हा चक्रावून टाकणारा आहे. योजनेतील पैसे लाटण्यासाठी चक्क 11 वर्षापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला जिवंत दाखवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यलस्थेला चालना देण्याचा (Government) सरकारचा प्रयत्न असला तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. कारण दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील विश्वनाथ देवमन भालतकड यांचा 10 ऑक्टोंबर 2010 रोजीच मृत्यू झाला आहे. असे असताना रोजगार हमीच्या वही पुस्तिकेवर त्यांचेच नाव लावून ते जिवंत असल्याचे भासवत पैसे उचलण्याचा प्रकार समोर आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या योजनेचे काय चित्र आहे हे लक्षात येते.

7 दिवस रोजगार हमी योजनेवर कामही

10 ऑक्टोंबर 2010 रोजी येवदा येथील विश्वनाथ देवमन भालतकड यांचे निधन झाले होते. असे असतानाही येवदा येथे सुरु असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर ते 7 दिवस आल्याचे दाखविण्यात आले आहे. परिसरातील ग्रामस्थांनी ही भालतकड यांच्या नावाचा उल्लेख पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजना सध्या अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही अशाप्रकारे चर्चिली जात आहे.

यामुळे घटना झाली उघड

रोजगार हमी योजनेवर दाखल होत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी एक पुस्तिका केली जाते. शिवाय कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावानेच हा रोजगार मिळत असतो. मात्र, अतिरिक्त कामगार दाखवण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. अशा अनियमिततेमधूनच विश्वनाथ देवमन भालतडक यांचे नाव जोडण्यात आले होते. मयत व्यक्तीचे नाव तर आहेच पण त्याने 7 दिवस काम केल्याचा उल्लेखही समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे.

मजुरांना किती असते मजुरी ?

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम तर मिळते पण येथील रोजंदारी ही अत्यल्प आहे. आतापर्यंत मजुरांना 238 रुपये मिळत होते. तर 2021-22 मध्ये यामध्ये वाढ करुन 248 रुपये करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शेतामध्ये मजुरी कराणाऱ्यांना 500 रुपये रोजगार आहे. म्हणजेच शासकीय कामापेक्षा दुपटीने मजुरी ही शेतामध्ये राबवल्यावर मिळत आहे. काळाच्या ओघात जो बदल व्हायला पाहिजे तो झाला नसल्याने ही परस्थिती ओढावली आहे.

संबंधित बातम्या :

Lasalgaon Market : कांद्याला उतरती कळा, हजाराच्या आतमध्येच दर, अतिरिक्त उत्पादनाचे करायचे काय?

Sugarcane sludge: क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप, तरीही ऊस फडातच, नेमकी चूक कारखान्यांची की शेतकऱ्यांची..!

Photo Gallery : अवकाळीच्या नुकसान खुणा, चिकूची बाग उध्वस्त, फळगळतीने स्वप्नांचा चकणाचूर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें