AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Untimely Rain : नुकसानीचा अहवाल अन् मदतीसाठी ठरावही, वर्धा पाठोपाठ ‘या’ जिल्ह्याची तत्परता

आठवड्याच्या सुरवातीलाच वर्धा, अमरावती आणि विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह खरीप आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशीच परस्थिती निर्माण झाली होती. मात्र, कृषी विभाग या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेला आहे.

Untimely Rain : नुकसानीचा अहवाल अन् मदतीसाठी ठरावही, वर्धा पाठोपाठ 'या' जिल्ह्याची तत्परता
अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यात काढणी झालेल्या तूर पिकाचे असे नुकसान झाले आहे.
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 3:57 PM
Share

अमरावती : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. खरीप हंगामापासून सुरु झालेले संकट आता (Rabi Season) रब्बी हंगाम मध्यावर आला तरी सुरुच आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार असतो तो शासकीय मदतीचा. आठवड्याच्या सुरवातीलाच वर्धा, अमरावती आणि विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह खरीप आणि (fruit crop ) फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशीच परस्थिती निर्माण झाली होती. मात्र, कृषी विभाग या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेला आहे. नुकसानीनंतर अवघ्या तीन दिवसांमध्येच याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार आहे. सोमवारी वर्धा जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल सादर केला तर मंगळवारी अमरावती जिल्हा प्रशासनाने. त्यामुळे आता मदत मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत.

कोणत्या पिकांचे झाले नुकसान

कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यातील 19 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचा समावेश आहे तर खरिपातील तूर आणि कापसाचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा बागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. अवकाळी आणि गारपिटमुळे 322 हेक्टरावरील संत्रा बागेचे नुकासान झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे अंतिम टप्प्यात असलेल्या कापसाचेच अधिक झाले आहे. अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला असून आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती मदतीची

मदतीसाठी जिल्हा परिषदेमध्ये ठरावही

गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आणि नुकसानच अधिक झाले आहे. खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे तर आता रब्बी हंगामातील पिके ही अवकाळी पाऊस आणि गारपिटाचा शिकार होत आहेत. चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचे नुकसान लक्षात घेता मदतीबाबत जिल्हा परिषदेच्या बैठकीत ठरावही घेण्यात आला आहे. यामध्ये संत्रा बागेचे मोठे नुकसा झाले असून मदतीबाबतचा ठराव जिल्हा परिषदेचे सदस्य शरद मोहोड यांनी मांडला होता. शिवाय हा ठराव एकमताने मंजूर करीत मदतीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

रब्बी हंगामातील पिकांची काळजी अन् कांदा लागवडीबाबत कृषी तज्ञांचा काय आहे सल्ला?

farmer producer company: आता शेतकरी उत्पादक कंपन्याही करणार तूरीची खरेदी, नेमका फायदा काय?

Rabi Season : शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला पण मुख्य पिकालाच फटका बसला

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.