कृषी विद्यापीठाकडील अतिरिक्त जमीन शेतकऱ्यांना परत करा: प्रहार जनशक्ती

मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणी तालुक्यातील बलसा, शेंद्रा, सायाळा, रायपूर, परभणी, खानापूर व टाकळगव्हाण या गावातील शेतकऱ्यांच्या सुपिक जमीनी अधिग्रहीत करुन स्थापना करण्यात आले. आज रोजी कृषी विद्यापीठाकडे अधिग्रहीत केलेल्या एकूण जमीनी पैकी 2500 हेक्टर शेत जमीन आतिरिक्त असून ती जमीन मागील अनेक वर्षापासून पडीक आहे.

कृषी विद्यापीठाकडील अतिरिक्त जमीन शेतकऱ्यांना परत करा: प्रहार जनशक्ती
संग्रहीत छायाचित्र

परभणी :  ( Marathwada Agricultural University) मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणी तालुक्यातील बलसा, शेंद्रा, सायाळा, रायपूर, परभणी, खानापूर व टाकळगव्हाण या गावातील शेतकऱ्यांच्या (Farmer) सुपिक जमीनी अधिग्रहीत करुन स्थापना करण्यात आले. आज रोजी कृषी विद्यापीठाकडे अधिग्रहीत केलेल्या एकूण जमीनी पैकी 2500 हेक्टर शेत जमीन आतिरिक्त असून ती जमीन मागील अनेक वर्षापासून पडीक आहे. परंतु मागील काही वर्षापासून विद्यापीठ प्रशासनाने मनमानी कारभार करीत नियमबाहा पध्दतीने ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर व नवोदय विद्यालयाला विद्यापीठाच्या नियमावलीत न बसणाऱ्या उद्देशासाठी जमीन दिली.

त्यामुळे विद्यापीठाने ही अतिरीक्त जमिन शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बाळासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, नारायण ढगे इत्यादींनी स्वाक्षऱ्या आहेत.

काय सांगतो शासन नियम

शासन निर्णया नुसार जर कृषी विद्यापीठाच्या अधिग्रहीत केलेल्या शेत जमीनी अकृषिक कामासाठी व उद्देशासाठी देता येत नाही असे स्पष्ट असेल तर मग या जमिनी अकृषिक कामासाठी देण्याचा घाट कृषी विद्यापीठाचे कुलगुरु व कुलसचिव का घालत आहेत व राज्य शासनाची दिशाभूल का करत आहेत याचा तपास करण्याची मागणी प्रहार संघटनेने केली आहे. ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर , नवोदय विद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व क्रीडा संकुल या अकृषिक कामासाठी व उद्देशासाठी विद्यापीठाच्या जमिनी देणे हे शासन निर्णया नुसारच बेकायदेशीर आहे. असे असतानाही कृषी विद्यापीठाचे कुलगुरूअशोक ढवण, कुलसचिव धीरज कदम अधिकाराचा गैरवापर करीत आहेत.

जमिन अधिग्रनाचा उद्देशच बाजूला राहिला

कृषि विद्यापीठ अधिनियम 1983 नुसार स्थापित विद्यापीठाद्वारे ज्या उद्देशाकरीता जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. अतिरिक्त जमीन कुठल्याही प्रकारच्या इतर अकृषिक कामासाठी अथवा उद्देशासाठी न वापरता ती शेतजमीन भुमी अधिग्रहण कायद्यानुसार मुळ मालकाला परत करण्यात यावी असा कायदा आहे. मात्र, याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

शिवाय या ठिकणी ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर व नवोदय विद्यालय यांच्यासाठी विद्यापीठाने जमिनी दिल्या आहेत. यामुळे कृषी विद्यापीठाने अधिग्रहीत केलेली जमीन अकृषिक कामासाठी देण्याच्या नियमबाह्य निर्णयास प्रहार जनशक्ती पक्ष व बलसा, शेंद्रा, सायाळा, रायपूर, परभणी, खानापूर व टाकळगव्हाण या भागातील अधिग्रहणासाठी जमीनी देणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे असे ही या निवेदनात म्हंटले आहे. (Return surplus land from Agricultural University to farmers: Prahar Jan Shakti demand)

संबंधित बातम्या :

पपईची लागवड करतानाच काळजी घ्या, अन्यथा बागच धोक्यात

यंदा रब्बी हंगाम लांबणीवर, योग्य नियोजन गरजेचे

रब्बी हंगाम : पुसा वाणाच्या गव्हाची लागवड करा अन् विक्रमी उत्पादन मिळवा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI