पपईची लागवड करतानाच काळजी घ्या, अन्यथा बागच धोक्यात

पपईच्या क्षेत्रात अद्यापही वाढ होत नाही. कारण लागवडी दरम्यान, शेतकरी योग्य ती काळजी घेत नाहीत त्याचा परिणाम पपईच्या उत्पादनावरच नव्हे तर बाग जोपासण्यावरही दिसून येत आहे. त्यामुळे लागवडी दरम्यानच योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस वातावरणातील बदलामुळे या फळबागेवर रोगराईचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

पपईची लागवड करतानाच काळजी घ्या, अन्यथा बागच धोक्यात
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : (Papaya) पपईच्या क्षेत्रात अद्यापही वाढ होत नाही. कारण लागवडी दरम्यान, शेतकरी योग्य ती काळजी घेत नाहीत त्याचा परिणाम पपईच्या उत्पादनावरच नव्हे तर बाग जोपासण्यावरही दिसून येत आहे. त्यामुळे लागवडी दरम्यानच योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस वातावरणातील बदलामुळे या फळबागेवर रोगराईचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

योग्य प्रकारे वाढ न झाल्याने फळांची वाढही होत नाही अखेर बाग नष्ट करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरत नाही. त्यामुळे लागवडीपासून फळ काढणीपर्यंत कशा पध्दतीने काळजी घ्यावी याबाबत प्रोफेसर चीफ सायंटिस्ट राजेंद्र प्रसाद व संशोधक डॉ. एस. के. सिंग यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. ज्यामुळे पपईचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे.

पपई ची लागवड करतानाच खोड पोखरणाऱ्या आळीचा धोका निर्माण होतो. याचे कारण म्हणजे पपईत बोरण याचे प्रमाण कमी असणे हे आहे. बोरनच्या कमतरतेचे एक सुरुवातीचे लक्षण म्हणजे पपईची पाने ही पिवळी पडतात. तर झाड हे ठिसूळ बनते.

रोगराईचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाल्यास पपईचे खोड हे मुळातूनच वाळण्यास सुरवात होते. “लेटेक्स” मुख्य खोडाच्या वरच्या भागावर, पानांच्या देठावरून आणि मुख्य शिराखाली त्याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे फांद्यापासून ते खोडापर्यंत झाड हे पोखरले जाते. यामुळे फळ लागण्यापूर्वीच पपईचे झाड हे कमकुवत होते.

हा आहेत रोगाची लक्षणे

बोरनच्या कमतरतेचे पहिले लक्षण म्हणजे फुलांची पडझड होते. शिवाय फळ वाढीस लागल्यास पांढरे डाग निर्माण होतात व त्यामुळे फळाची वाढ खुंटते. पपई फळाची लागण तर होते पण त्याची वाढच होत नाही. त्यामुळे लागवड करतानाच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा फळाची वाढ होत नाही शिवाय आणि त्याची गळती होण्यास सुरवात होते. पपईला फळ लागतानाच ही लक्षणे आढळून येतात. परिणामी केलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. डॉ. एस. के. सिंग यांच्या मते फळ लागण्यापूर्वीच फुल अवस्थेत असताना त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

बोरनच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या विकृतींचे व्यवस्थापन कसे करावे?

लागवड करण्यापीर्वीच माती परीक्षण करुन बोरनचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे. जर माती परीक्षण शक्य नसेल तर लागवड करताना प्रत्येक वनस्पतीमागे 8 ते 10 ग्रॅम बेसल डोस देणे गरजेचे आहे. शिवाय ही प्रक्रीया फळ लागवडीसाठी जमिन नांगरतानाही करता येते. बोरन 6 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि पहिल्या महिन्यापासून 8 व्या महिन्यापर्यंत एका महिन्याच्या फरकाने फवारणी केल्याने फळावरील रोगराई ही नाहीशी होऊ शकते. अशा पध्दतीने काळजी घेत लागवड केली तरच पपईचे उत्पादन शक्य होणार आहे. मात्र, लागवडी दरम्यान शेतकरी या रोगाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे उत्पादनावर तर परिणाम होतोच पण आर्थिक फटकाही तहन करावा लागतो. (Proper care needs to be taken while cultivating papaya orchards; Otherwise the garden is in danger)

संबंधित बातम्या :

यंदा रब्बी हंगाम लांबणीवर, योग्य नियोजन गरजेचे

रब्बी हंगाम : पुसा वाणाच्या गव्हाची लागवड करा अन् विक्रमी उत्पादन मिळवा

काय सांगता ? जनावरांसाठीही आता चॉकलेट कॅंडी, पोषण आहार अन् सर्वकाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI