अवकाळी, ढगाळ वातावरणानंतर आता उन्हाच्या झळा, मराठवाड्यात मात्र कोरडे वातावरण

निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची अनुभती गेल्या चार दिवसांमध्ये आलेली आहे. गतआठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठावाड्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते. मात्र, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तापमानात वाढ झाली आहे. विशेषत: मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.अणखी दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे.

अवकाळी, ढगाळ वातावरणानंतर आता उन्हाच्या झळा, मराठवाड्यात मात्र कोरडे वातावरण
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 5:07 PM

मुंबई : निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची अनुभती गेल्या चार दिवसांमध्ये आलेली आहे. गतआठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह कोकणात  (Untimely Rain)अवकाळी पावसाने हजेरी लावली होती तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठावाड्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते. मात्र, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (Temperature) तापमानात वाढ झाली आहे. विशेषत: मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.अणखी दोन दिवस ही (Heat wave) उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. तर दुसरीकडे राज्यातून अवकाळी गायब झाली असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात हवामान हे कोरडे राहणार आहे. मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच उन्हामध्ये वाढ झाली होती. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच पारा 36 अंशापर्यंत गेला तर एप्रिल-मे मध्ये काय होणार हा प्रश्न आता मुंबईकरांच्या समोर आहे.

मुंबईत 35 ते 40 तापमानाची नोंद

गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ होत आहे मात्र, सोमवारी याची तीव्रता अधिकच वाढली होती. मुंबई महानगर परिसरात 36 ते 40 अंश सेल्सिअसची एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. सकाळी 11 ते दुपारी 4 च्या दरम्यान उन्हाच्या झळा अधिक तीव्र असणार आहेत. पुढील दोन दिवस ही लाट कायम राहणार आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कोरडे वातावरण

गेले तीन दिवस ढगाळ वातावरण आणि काही भागात अवकाळीचा कहर झाल्यानंतर सोमवारपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रत कोरडे हवामान आहे. तर इतरत्र भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.गोवा आणि कोकणच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत तापमानात वाढ झाली आहे. पण आता दिवसेंदिवस तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पीक काढणी कामाला येणार वेग

मध्यंतरीच्या अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पीक काढणीला ब्रेक लागला होता. पण आता वातावरण निवळले आहे. त्यामुळे ज्वारीसह गहू, हरभरा काढणी कामे ही वेगात होणार आहे. अवकाळी पावसाने मराठवाड्याला बगल दिल्याने संभाव्य नुकसान हे टळलेले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : सोयाबीन-हरभऱ्याचे दर स्थिर, आवक मात्र तेजीत, आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे चित्र?

रोहयो : रोजगाराची हमी पण अत्यंल्प मजुरी, वर्षभरानंतर झालेली वाढही चक्रावून टाकणारी!

Photo Gallery : शेतकऱ्यांच्या आंदोलनात पथनाट्य, आता तरी मिळेल का न्याय?

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.