AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Banana Leaf: केळीच्या पानावर का असतात रेषा? त्यामागील कारण काय? जाणून घ्या…

Secret Of Banana Leaf Structure: केळीच्या पानावर जेवणाचा स्वाद काही वेगळाच, नाही का? केळीचे पान रोडगे भाजण्यासाठी पण वापरतात. केळीच्या पानावर जेवणाची जुनी परंपरा आहे. या पानावर रेषा का असतात?

Banana Leaf: केळीच्या पानावर का असतात रेषा? त्यामागील कारण काय? जाणून घ्या...
केळीच्या पानावर का असतात रेषा?
| Updated on: Jul 12, 2026 | 4:10 PM
Share

Secret Of Banana Leaf Structure: केळीच्या पानावर जेवणाची जुनी परंपरा आहे. पूजेपासून प्रसाद आणि जेवणापर्यंत केळीच्या पानाचा मोठा वापर होतो. केळीचे पान त्याच्या विशिष्ट रचनेमुळे आकर्षक दिसते. त्याची रचनाच इतकी खास आहे की हे पान मनमोहन घेते. केळीचे पान आकाराने लहान, मध्यम आणि मोठे असते. केळीच्या पानाचे निरीक्षण केल्यावर त्याच्यावर रेषा दिसतात. तुम्हाला वाटेल की त्यात काय नवल? प्रत्येक हिरव्या पानावर रेषांचे जाळे असतेच. पण या रेषांमागे शास्त्रीय आणि नैसर्गिक कारणं आहेत.

केळीच्या पानावर रेषा असण्यामागे कारण काय?

केळीचे पान आकाराने मोठे, मध्यम आणि लहान असते. ते जमिनीवर दाबून ठेवल्यास कागदासारखे सरळ होते. जोरदार हवेत केळीचे झाड झुकतात. पडतात. जोरदार हवेत केळीचे पानही पडतात. केळीची ही पानं जोरदार हवेत झाडंचं रक्षण करण्यास मदत करतात. जोरदार हवेत पानं अनेक ठिकाणी फाटतात आणि त्यातून हवा निघून जाते. यामुळे केळीच्या झाडाचे कमी नुकसान होते. शास्त्रीय कारणानुसार केळीतील या रेषा पानांमध्ये पाणी, खनिजं आणि पोषण तत्त्व पोहचवण्याचे करतात. एकप्रकारे त्या शरीरातील नसांसारखे काम करतात. केळीचे पानं ही मोठी असतात आणि त्यांना अधिक पोषण, खनिजांची गरज असते. या रेषांमुळे हे पोषण सर्व पानांना व्यवस्थितरित्या मिळते. पानं हिरवीगार राहतात आणि झाडाला फायदा होतो.

मधल्या रेषेमुळे जेवण वाढण्यास सोपे

केळीच्या पानावर जेवणाचा स्वाद येतो. केळीच्या पानावरील मधल्या मोठ्या रेषेमुळे जेवणातील पदार्थ ठेवण्यास मदत मिळते. वरील भागात मीठ, लोणचं, पापड, चटणी आणि कोरड्या भाजांची मांडणी होते. तर भात, चपाती आणि वरणासाठी आळं करण्यासाठी खालच्या भागाचा वापर करण्यात येतो. यामुळे अन्नपदार्थ एकत्र होत नाही आणि प्रत्येक पदार्थाची चव चाखता येते.

केळीच्या पानात रोडगे भाजली जातात. केळीच्या पानावर वाग्यांचे भरीत आणि भाकर खाण्याची मजा काही औरच येते. केळीचे पान सहज मोडल्या जाते. त्यात अन्नपदार्थ झाकूनही देता येतात. आता तर केळीच्या पानाचे मोल्ड तयार करण्यात आले असून केळीच्या पानाच्या पत्रावळीही बाजारात आल्या आहेत. या पत्रावळी सहज विघटित होत असल्याने प्रदूषण होत नाही.

Follow Us
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...