पहिल्या लॉकडाऊनमधील नुकसान भरुन काढण्यासाठी जिद्दीनं राबला, दुसऱ्या लाटेनं युवा शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी फेरलं

बाजारपेठा बंद असल्यामुळे अपार मेहनत घेऊन पिकविलेल्या पिकाचा भाव कवडीमोल झाला आहे. Sindhudurg watermelon farmer

पहिल्या लॉकडाऊनमधील नुकसान भरुन काढण्यासाठी जिद्दीनं राबला, दुसऱ्या लाटेनं युवा शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी फेरलं
सिंधुदुर्ग कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 12:02 PM

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील एका कलिंगड शेतकऱ्याचे  लॉकडाऊनने कंबरडे मोडले आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे अपार मेहनत घेऊन पिकविलेल्या पिकाचा भाव कवडीमोल झाला आहे. त्यामुळे या तरुण शेतकऱ्यापुढे आता करायचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कसाल मधील निलेश गावडे या तरुण युवकाने गडमठ या परिसरामध्ये सात एकर मध्ये कलिंगडाची लागवड केली होती. परंतु लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा मोठं नुकसान सहन कराव लागलं आहे.(Sindhudurg watermelon farmer facing problem due to second wave of corona and lockdown)

गतवर्षीप्रमाणं यंदाही फटका

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्येही निलेश गावडे यांच्यासमोर ही परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वच मार्केट बंद असल्याने कलिंगड विक्रीला मोठा ब्रेक लागला. त्यामध्ये गावडे यांना 7 लाखाचं नुकसान झालाय. एवढं मोठं नुकसान भरून कस काढायचं हा समोर प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय. , अक्षरश: चार ते पाच एकरचे प्लॉट मधील कलिंगड जमीनदोस्त झाले आहेत.

निलेश गावडे दरवर्षी 7 ते 8 एकरमध्ये कलिंगड या पिकाची लागवड करतात. गतवर्षी देखील त्यांनी 7-8 एकरमध्ये कलिंगड या पिकाची लागवड केली. गेल्या वर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गतवर्षी मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान यंदाच्या उत्पन्नात भरुन निघेल या हेतूने गावडे यांनी कलिंगडाचे पीक घेतले. मात्र,यावर्षी देखील कोरोना महामारीने अक्षरश: त्यावर पाणी सोडले.

कलिंगड लागवडीला खर्च किती येतो?

निलेश गावडे सांगतात, दरवर्षी कलिंगड लागवडीसाठी प्रत्येकी एक एकरामागे 1 लाख रुपये खर्च येतो. मल्चिंग पेपर , ठिबक , पाईप लाईन , खते , मजुरी पाहता हा खर्च मोठा होतो. परिणाम: सात ते आठ एकरामध्ये सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. खतं आणि कीटकनाशकं विकत घ्यायची तर शेतकऱ्याला सगळी रक्कम रोख स्वरुपात द्यावी लागते.

लॉकडाऊनच्या आधी 8 ते 9 रुपये प्रति कलिंगड भाव मिळत असे. लॉकडाऊन मध्ये तर 1 ते 2 रुपये भाव मिळतो आहे. सध्या बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यापारीही मिळत नाही. शेतीसाठी केलेला खर्च प्राप्त व्हावा या कारणाने 1 ते 2 रुपयांनी व्यापाऱ्यांना कलिंगड द्यावे लागत आहे, असं निलेश गावडे सांगतात.

कोविड-19 चं संकट आलं नव्हतं तेव्हाही लागवडीचा वाढता खर्च, भावातला चढउतार यामुळे कलिंगडाची शेती बेभरवशाचीच होती, असं निलेश गावडे म्हणाले. आता सगळंच ठप्प झाल्यानंतर शेतकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांसाठी यंदाचा हंगाम आतबट्ट्याचा ठरला आहे, असं शेतकरी म्हणत आहेत.

इतर बातम्या:

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? सामना संपादकीयमधून सूचक इशारा?

मरावाड्यात कोरोनाता वाढता धोका, औरंगाबाद आणि परभणीत प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय

(Sindhudurg watermelon farmer facing problem due to second wave of corona and lockdown)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.