मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखद धक्का, नाही भासणार खतांचा तुटवडा

| Updated on: Oct 24, 2021 | 12:48 PM

खरीप हंगामातील नुकसान बाजूला सारत बळीराजा पुन्हा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. पूर्वमशागतीची कामे सुरु असून शेतकऱ्यांनाही अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये खतांचा तुटवडी भासू नये म्हणून कृषी विभागही सरसावलेला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यासाठी 2 लाख 95 हजार टनाचा खताचा पुरवठा केला जाणार आहे.

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखद धक्का, नाही भासणार खतांचा तुटवडा
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : खरीप हंगामातील (Kharif Season) नुकसान बाजूला सारत बळीराजा पुन्हा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. पूर्वमशागतीची कामे सुरु असून शेतकऱ्यांनाही अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये खतांचा तुटवडी भासू नये म्हणून कृषी विभागही सरसावलेला आहे. मराठवाड्यातील  (Aurangabad Division) औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यासाठी 2 लाख 95 हजार टनाचा खताचा पुरवठा केला जाणार आहे. या तीन्ही जिल्ह्यातून रब्बी हंगामासाठी 4 लाख टन खताची मागणी करण्यात आली होती. ( Fertilizer Supply, ) मात्र, अद्याप हंगाम सुरु होण्यास आवधी असून उर्वरीत खताचाही पुरवठा केला जाणार असल्याचे औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले आहे.

यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामातील पिकांवरच आहे. यामध्येच यंहा हरभऱ्याचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातून मागणी अधिकची असली तरी त्या वेळेनुसार पुरवठा होणार आहे. शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासू दिला जाणार नसल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

जिल्हनिहाय अशी झाली आहे खताची मागणी

कृषी विभागाकडून औरंगाबाद जिल्ह्यासाठी 1 लाख 86 हजार टन, जालना 1 लाख 9 हजार टन, तर बीड जिल्ह्यासाठी 1 लाख 35 हजार टन मिळून 4 लाख 30 हजार टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली. यामध्ये 1 लाख 42 हजार टन युरिया, 46 हजार 798 टन डीएपी, 29 हजार 134 टन एमओपी, 1 लाख 80 हजार टन एनपीके, तर 32 हजार 780 टन एसएसपी खताचा समावेश होता. मागणीच्या तुलनेत पुरवठा हा कमी असला तरी काही दिवसांमध्ये पुर्तता केली जाणार आहे.

रासायनिक खतांची उपलब्धता

औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांकरिता रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तीन जिल्ह्यात मिळून एक लाख 39 हजार 125 टन विविध प्रकारचे रासायनिक खते तिन्ही जिल्ह्यात उपलब्ध आहेत. शिवाय यंदा रब्बी हंगाम उशिराने सुरु होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्येच खऱ्या अर्थाने खताची मागणी ही वाढणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 80 हजार टन विविध प्रकारची खते आहेत. भविष्यातील नियोजन करण्यात आल्याने खताचा तुटवडा भासणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. भासणार नाही, याची दक्षता घेत आहोत. (Smooth supply of fertilizers to three districts of Marathwada, planning of fertilizers by agriculture department)

संबंधित बातम्या :

बैलाच्या खांद्यावरील सुज वेदनादायी अन् कामावर परिणाम करणारी, काय आहेत उपाय?

कापसामध्येही सावकारकी ! तोंडी सौदे करुन शेतकऱ्यांची होतेय लूट

आता नाही मजुरांची चिंता, 8 तासात 80 किलो कापसाची होणार वेचणी