AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता नाही मजुरांची चिंता, 8 तासात 80 किलो कापसाची होणार वेचणी

पावसाने नुकसान त्यात एकरी 5 हजाराचा काढणी खर्च त्यामुळे सोयाबीन हे अद्यापही शेतातच आहे. पण कापूस वेचणीसाठी अद्यावत यंत्र आले आहे. ज्याच्या माध्यमातून शेतकरी स्वता: 8 तासामध्ये चक्क 80 किलो कापसाची वेचणी करु शकणार आहे. त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे आणि मजुरांवरही खर्च होणार नाही.

आता नाही मजुरांची चिंता, 8 तासात 80 किलो कापसाची होणार वेचणी
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 6:36 PM
Share

मुंबई : यंदाच्या हंगामात शेतकऱ्याला सर्वाच भेडसावणारा प्रश्न होता तो मजुराचा. (Kharf Season) पीक काढणीला आले असतानाही मजूरच मिळत नव्हते. अनेक शेतकऱ्यांनी तर सोयाबीन काढलेच नाही. आगोदरच पावसाने नुकसान त्यात एकरी 5 हजाराचा काढणी खर्च त्यामुळे सोयाबीन हे अद्यापही शेतातच आहे. (cotton picker) पण कापूस वेचणीसाठी अद्यावत यंत्र आले आहे. ज्याच्या माध्यमातून शेतकरी स्वता: 8 तासामध्ये चक्क 80 किलो कापसाची वेचणी करु शकणार आहे. त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे आणि मजुरांवरही खर्च होणार नाही. दिवसेंदिवस कापसाचे क्षेत्र हे घटत आहे. मजूर मिळत नसल्यानेच ही व अवस्था झाली आहे. मात्र, आता यंत्राच्या सहाय्याने कापूस वेचणी अगदी सुलभ होणार आहे.

एका कंपनीने हे मशीन तयार केले आहे. कपाशी क्षेत्राचा विचार केला तर मजूर टंचाईच्या समस्येने दरवर्षी कपाशीचे क्षेत्र कमी होत आहे. एकट्या मराठवाड्याचा विचार केला तर पाच वर्षांपूर्वी कपाशी लागवडीखालील क्षेत्र हे 17 लाख हेक्‍टर होते. यावर्षी अवघ्या साडेबारा लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे वाचण्यासाठी मजुरीचे वाढलेले दर आणि वेळेत वेचणीला मजूर मिळत नसल्यामुळे क्षेत्र कमी होण्यास सुरुवात झाली आहे. शेती कामाकडे मजुर हे पाठ फिरवत आहेत. शिवाय यंदा पावसामुळे कापूस हा चिखलातच होता. त्यामुळे कापसाची वेचणी रखडली परिणामी उत्पादन घटले आहे.

कसे करते यंत्र काम?

* या मशीनच्या मागच्या बाजूला म्हणजे पाठीमागे एक मोठी बॅग लावलेली आहे. * तसेच यंत्राला दोन प्लास्टिकच्या दाते बसवण्यात आले आहेत. * हे यंत्र नुसते कपाशीच्या बोंडा जवळ नेले असता एक कापूस ओढून मागे लावलेल्या पिशवी मध्ये ऑटोमॅटिक टाकते. कापसाबरोबर दुसरा कोणताही भाग ते गोळा करीत नाही हे विशेष. * हे वजनाने हलके असल्यामुळे सहजतेने हाताळता येते.त्याला एक वरच्या बाजूला बटण असून ते बटन चालू केले असता मशीन बोंडा जवळ नेले असता कापूस आत मध्येखेचलाजातो. * या मशीन चे वैशिष्ट्य म्हणजे या मशीनच्या सहाय्याने कापूस वेचणी केले असता कापसामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा अथवा घाणखेचली जात नाही. कापूस हा स्वच्छ आणि दर्जेदार येतो.

सोयाबीन काढणीला एकरी 5 हजार रुपये

खरीपातून सर्वाधिक उत्पादन मिळवून देणाऱ्या सोयाबीनची यंदा मात्र, वेगळीच कथा झाली आहे. पेरणीपासून हे पीक संकटात होते अखेर काढणी करतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रखडलेल्या सोयाबीनची सध्या काढणी कामे ही सुरु आहेत. तर बाजारपेठेत सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळतोय तर दुसरीकडे हेच सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांना एकरी 5 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. (Now use of machine for cotton picking, one quintal of cotton picker a day )

संबंधित बातम्या :

बदलती शेती : मोती लागवडीतून शेतकरी समृध्द, कशी आहे लागवड पध्दत

लोकसहभागातून आता ‘ई-पीक पाहणी’चा उपक्रम, कृषी विद्यापीठातील विद्यार्थीही बांधावर

हमीभाव केंद्राबाबत यंदा दुजाभावच, खरीप अंतिम टप्प्यात तरीही निर्णय प्रलंबीत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.