बार्शीच्या शेतकऱ्याची दुष्काळावर मात, खजूर शेतीतून लाखोंची कमाई, राजेंद्र देशमुख यांची प्रेरणादायी यशोगाथा नक्की वाचा

| Updated on: Jun 17, 2021 | 4:47 PM

एका शेतकऱ्याने मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचा उदाहरण सोलापुरातल्या बार्शी इथल्या एका शेतकऱ्याने दाखवून दिलेय. साधारणतः अति उष्ण कटिबंधात उत्पादन घेण्यात येणाऱ्या खजूर पिकाची यशस्वी लागवड करून लाखो रुपयांचा नफा राजेंद्र देशमुख या शेतकऱ्यानं मिळवलाय.

बार्शीच्या शेतकऱ्याची दुष्काळावर  मात, खजूर शेतीतून लाखोंची कमाई, राजेंद्र देशमुख यांची प्रेरणादायी यशोगाथा नक्की वाचा
राजेंद्र देशमुख
Follow us on

सोलापूर: एका शेतकऱ्याने मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचा उदाहरण सोलापुरातल्या बार्शी इथल्या एका शेतकऱ्याने दाखवून दिलेय. साधारणतः अति उष्ण कटिबंधात उत्पादन घेण्यात येणाऱ्या खजूर पिकाची यशस्वी लागवड करून लाखो रुपयांचा नफा राजेंद्र देशमुख या शेतकऱ्यानं मिळवलाय. राजेंद्र देशमुख यांचा हा प्रयोग नक्कीच धाडसी आहे. शिवाय इतर शेतकऱ्यांनी सुद्धा प्रेरणा घेण्यासारखा देखील आहे. (Solpaur Barhsi Farmer Rajendra Deshmukh Date Palm Farming and earn money)

पारंपारिक शेतीला अभ्यासाची जोड

खजुराची बाग पाहून हे दृश्य कच्छ किंवा राजस्थानमधील आहे असे आपल्याला जरूर वाटेल. मात्र, बार्शीच्या राजेंद्र राऊत यांनी खजुराची ही बाग किंवा खजूर शेती मोठ्या कष्टानं उभारलीय. 1986 पासून वडिलोपार्जित 25 एकरांमध्ये राजेंद्र देशमुख शेती करत आहेत. ते सुरुवातीच्या काळात पारंपरिक पिकांबरोबरच द्राक्ष शेतीचे उत्पादन घ्यायचे. काही वर्षे त्यांनी आपली द्राक्षं निर्यात देखील केली. मात्र, वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला जावं लागत होते. त्यामुळे त्यांनी फळपिके घेण्याकडे आपला कल ठेवला आणि त्यासाठी अभ्यास करण्याची तयारी ही देशमुखांनी ठेवली.

2008 साली खजूर शेतीचा प्रयोग

वारंवार पडणाऱ्या दुष्काळाचा सामाना करायचे असेल तर कमी पाण्यावर येणाऱ्या फळपिकांसाठी राजेंद्र देशमुख यांनी 2008 साली खजूर शेती करण्याचा निर्णय घेतला. आता खजूर शेतीतून त्यांना चांगले पैसे मिळत आहेत. सुरुवातीला राजेंद्र देशमुख यांनी गुजरात वरून खजुराची रोपे आणून बांधावर प्रयोग केला शिवाय त्याचा अभ्यास करून रोपवाटिकेत करून तीन एकरात दोन हजार झाडांची लागवड केली आहे. 2013 पासून देशमुख यांना खर्च वजा जाता एकरी दोन ते अडीच लाखांचा उत्पादन मिळतं आहे, असं राजेंद्र देशमुख यांनी सांगितलं आहे.

अशी केली लागवड

राजेंद्र देशमुख यांनी तीन एकरामध्ये दोन हजार झाडं लावली आहेत. दोन ओळीत अठरा फूट आणि दोन झाडात सव्वा तीन फुटाचे अंतर ठेऊन शेती झाडं लावली. सव्वा तीन फुटाच्या अंतरावर सीताफळ,गोड चिंच लागवड करुन आंतर पिकं घेऊन उत्पादन वाढवलं. खजुराचं झाड उन्हाळयात महिन्यातून एकदा पाणी दिले तरी टिकते.

पिकेल ते विकेल योजनेत खजूर विक्री

राजेंद्र देशमुख यांची खजुराची झाड आता सहा फुटापर्यंत वाढली आहेत. महाराष्ट्रात अश्या प्रकारचे उत्पादन खूप कमी प्रमाणात शेतकरी घेत असल्यामुळे राजेंद्र देशमुख यांच्या खजुराला चांगलीच मागणी आहे. बार्शीच्या बाजारातच देशमुख यांच्या खजुराला 100 ते 110 रुपये किलो भाव मिळतोय. तर. लॉकडाऊनच्या काळात राजेंद्र देशमुख यांनी बार्शी सोलापूर रस्त्यावर सरकारच्या पिकेल ते विकेल या योजेनच्या साहाय्याने खजूर विकले त्याला ही चांगला प्रतिसाद मिळालाय.

नाविन्यूपूर्ण प्रयोगातून इतरांसमोर आदर्श

राजेंद्र देशमुख यांनी सतत शेतीत नवनवीन प्रयोग ,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अति उष्ण कटिबंधात लागवड करण्यात येणाऱ्या खजुराचे यशस्वी लागवड करुन दाखवली आहे. देशमुख यांच्या प्रयोगातून होत आहे रे केलेची पाहिजे याचा प्रत्यय येतो. देशमुख यांनी इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवलाय. कृषी क्षेत्रातले जाणकार आणि अभ्यासक राजेंद्र देशमुख यांच्या शेताला भेट देतात. देशमुख यांना कृषी विभागाच्या कृषी सहायक कल्पक चाटी आणि प्रा. रेश्मा शिंदे यांचं मार्गदर्शन लाभतं

संबंधित बातम्या:

Weather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा

मिरची शेती शेतकऱ्यांना यंदाही चांगले पैसे मिळवून देणार, मागणी वाढल्यानं बियाणं महागलं

(Solpaur Barhsi Farmer Rajendra Deshmukh Date Palm Farming and earn money)