AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : दरातील चढ-उतारानंतर स्थिरावले सोयाबीन, उन्हाळी सोयाबीनचे सोनं करा..!

1 जून रोजी राज्यातील बहुतांश हरभरा खरेदी केंद्र ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नाफेडचे हरभरा खरेदीचे उद्दिष्टपूर्ण झाल्यामुळे हा निर्णय झाला होता. मात्र, त्याचा परिणाम अजूनही हरभरा दरावर होत आहे. कारण गेल्या 15 दिवसांमध्ये हरभरा दरामध्ये 150 रुपयांची घसरण झाली आहे.

Latur Market : दरातील चढ-उतारानंतर स्थिरावले सोयाबीन, उन्हाळी सोयाबीनचे सोनं करा..!
सोयाबीनचे दर स्थिर
| Updated on: Jun 18, 2022 | 3:46 PM
Share

लातूर : ऐन (Kharif Season) खरीप हंगामाच्या तोंडावर (Soybean Rate) सोयाबीनचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरात घसरण झाली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनला 6 हजार 450 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. सध्या खरिपाच्या अनुशंगाने आवक वाढली असतानाही हा दर मिळत असल्याने शेतकरी समाधानीआहे पण खुश नाही अशीच स्थिती आहे. (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरिपातील सोयाबीन, तूर आणि रब्बीतील हरभऱ्याची आवक सुरु आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर 4 हजार 500 रुपयांवर असलेला हरभरा आता 4 हजार 350 रुपये क्विंटलवर येऊन ठेपला आहे. उन्हाळी सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे.

उन्हाळी सोयबीनचे बियाणे करा

यंदा कधी नव्हे ते मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पदरात पडले आहे. पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली होती. मात्र, सध्या अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन हे बियाणे म्हणून विक्री केले तर अधिकचा फायदा होणार आहे. सध्या खरीप पेरण्यामुळे बियाणाला मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य बाजारपेठे शोधून बियाणे म्हणून सोयाबीन विकले तर प्रति किलो 80 रुपये असा दर मिळणार आहे. मात्र, बियाणांची प्रक्रिया होणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

सोयाबीनची आवक वाढली

खरीप हंगामातील सोयाबीन पीक हे आता अंतिम टप्प्यात आहे. शिवाय खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पैशाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीनची साठवणूक न करता थेट बाजारपेठेत आणले जात आहे. आतापर्यंतच्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित दर सोयाबीनला मिळालाच नाही. त्यामुळे किमान खरीप हंगामाचा खर्च तरी भागेल या आशेने आता आवक वाढली आहे.

खरेदी केंद्र बंद हरभऱ्यावर परिणाम

1 जून रोजी राज्यातील बहुतांश हरभरा खरेदी केंद्र ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नाफेडचे हरभरा खरेदीचे उद्दिष्टपूर्ण झाल्यामुळे हा निर्णय झाला होता. मात्र, त्याचा परिणाम अजूनही हरभरा दरावर होत आहे. कारण गेल्या 15 दिवसांमध्ये हरभरा दरामध्ये 150 रुपयांची घसरण झाली आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना 5 हजार 230 रुपये असा हमीभाव देण्यात आला होता. तर खुल्या बाजारपेठेत 4 हजार 500 दर होते. मात्र, खरेदी केंद्र झाल्याने आहे त्या दरातही घट झाली आहे. त्यामुळे आधारभूत किंमतीचा आधारच हरभरा उत्पादकांना मिळालेला नाही.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.