AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ, शेतकऱ्यांना खरचं फायदा झालाय?

गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे 11 महिन्यांमध्ये सोयाबीनचं तेल तब्बल 72 टक्के महागलं आहे. Soybean oil prices Increase

सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ, शेतकऱ्यांना खरचं फायदा झालाय?
महागाईची फोडणी तोंडाची चव घालवणार; खाद्यतेल महागले
| Updated on: May 01, 2021 | 5:12 PM
Share

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणूी संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. काही राज्यांनी कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. आरबीआयच्या माहितीनुसार निर्बंध कायम राहिल्यास मागणी पुरवठा साखळीवर परिणाम होईल. यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. परिणामी महागाईच्या झळा बसू शकतात. भारतातील वायदेबाझार नॅशनल कमोडिटी अँड डेरीवेटिव्स एक्सचेंजनं देशात महागाई वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. (Soybean oil prices Increase 72 percent in Just 11 Months Food and beverages price will be expensive)

सोयाबीन तेल महागलं

गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे 11 महिन्यांमध्ये सोयाबीनचं तेल तब्बल 72 टक्के महागलं आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार सोयाबीन तेल आणखी महागू शकतं.  या सर्वाचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होऊ शकतो.

शेतकऱ्यांना फायदा मिळतोय?

सोयाबीनचा भाव मागील वर्षाच्या तुलनेत चांगलाच वाढला आहे. देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एका क्विंटलला 4500 ते 7000 रुपये  या दरम्यान दर मिळाला आहे. काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यापेक्षा कमी किमतीला देखील सोयाबीन विकल्याचं दिसून येतं.

सोयाबीन तेलाचे दर का वाढले?

सोयाबीन तेलाचे दर वाढण्यामागे लोकांची अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवणं ही बाब आहे. कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्यानं लॉकडाऊनच्या भीतीनं लोक अतिरिक्त साठा करुन ठेवत आहेत. मागणी वाढल्यानं पुरवठ्यावर ताण येऊन किमती वाढत असल्याचं निरीक्षण काही तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय संशोधकांनी सोयाबीनचं नवं वाण तयार केलं आहे. या वाणाचा नाव MACS 1407 हे आहे. पुणे येथील संशोधन संस्थेने सोयाबीनच वाण तयार केलं आहे. या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल सोयाबीनंचं उत्पादन होऊ शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना एमएसीएस 1407 वाणाचं बियाणं पुढील हंगामापासून उपलब्ध होणार आहे.

संबंधित बातम्या:

कर्नाटकातील सुपरहिरो, पडीक शेतीमध्ये 700 झाडांची लागवड, पाण्यासाठी खोदल्या 5 गुहा

पुण्याच्या संस्थेकडून सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती, एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल उत्पादन मिळणार

(Soybean oil prices Increase 72 percent in Just 11 Months Food and beverages price will be expensive)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.