AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवगामी तांदूळ, कटप्पा तांदूळ, बाहुबलीतील व्यक्तिरेखांची बियाण्यांना नावं, खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी

बाजारात आलेल्या धानाच्या बियाणांपैकी बाहुबली, कटप्पा, शिवगामीने जिल्ह्यातील शेतकरी आकर्षित होत आहेत. (New varieties of paddy will be available at Bhandara agriculture center)

शिवगामी तांदूळ, कटप्पा तांदूळ, बाहुबलीतील व्यक्तिरेखांची बियाण्यांना नावं, खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी
शेतकरी
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 12:05 PM
Share

भंडारा : बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी भंडाऱ्यात दाखल झालं आहे. कृषी केंद्रात मिळणार नवीन बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी नावाचे धानाचे वाण करणार आहे. त्यामुळे भंडारा जिल्हावासीय बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी तांदूळ खाणार आहे. मात्र बियाणाचे भाव वाढले आहेत. (The new varieties of paddy will be available at Bhandara agriculture center)

बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी भंडाऱ्याच्या बाजारात दाखल झाले. दक्षिण भारतातील ही सुप्रसिद्ध बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी भंडारा जिल्ह्यात काय करतात? पण या खऱ्या अभिनेत्यांची नावे नसून भंडारा जिल्ह्यात दाखल झालेल्या नवीन धानाच्या वाणाची नावे आहेत.

बी-बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी

भंडारा जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाची चाहूल लागताच जिल्हाभरातील शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. बी-बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहे. यावर्षी मात्र बाजारातील धानाच्या बियाणांची अफलातून आणि विचित्र नावे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाजारात आलेल्या धानाच्या बियाणांपैकी बाहुबली, कटप्पा, शिवगामीने जिल्ह्यातील शेतकरी आकर्षित होत आहेत.

आता जिल्ह्यात या धानाच्या वाण (बियाणे) स्टॉक ही सांपला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी या अफलातून नावाच्या वाण पिकांच्या धानाची लागवड करत आहे. भंडारा जिल्ह्यावासीय बाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी नावाचा तांदूळ भविष्यात खाणार आहे.

बियाणांच्या दरात किंचित वाढ

धान्याची नावे जरी आकर्षक असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांचा किमतींमध्ये 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर काही वानांमध्ये ही वाढ जास्तही झालेली आहे. तसेच इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे  वाहतूक खर्च वाढला आहे. यामुळे बियाणांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. तरी बियाणांची अशी प्रसिद्ध आणि अफलातून नावे शेतकऱ्यांना असल्याने आकर्षित होत आहे. (The new varieties of paddy will be available at Bhandara agriculture center)

संबंधित बातम्या : 

शेतकऱ्यांना मालामाल बनवेल ‘ही’ औषधी वनस्पती, एका एकरात 4 लाख रुपयांपर्यंत कमाईची संधी

PM Kisan : पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे अपात्र शेतकरी केंद्राच्या निशाण्यावर, पैसे परत घेण्याचं काम सुरु

गाव आणि शहरातील जमीन विक्रीवर कर द्यावा लागतो? जाणून घ्या काय असतात नियम?

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.