Crop Insurance : पीकविम्याचे धोरण बदलले, सरकारी विमा कंपनीचा काय तोटा काय फायदा? वाचा सविस्तर

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरिपातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीचा विचार करुन पिकांचा विमा अदा करणे गरजेचे आहे. शिवाय पेरा झालेल्या क्षेत्रावरील पिके धोक्यात आहेत. पिके किडीच्या प्रादुर्भावात येतील अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे पिकांना विम्याचे संरक्षण महत्वाचे झाले असून बदलत्या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.

Crop Insurance : पीकविम्याचे धोरण बदलले, सरकारी विमा कंपनीचा काय तोटा काय फायदा? वाचा सविस्तर
50 हजार प्रोत्साहनपर रकमेची आतापर्यंत तीन वेळेस घोषणा झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही या रकमेची प्रतिक्षा आहे.
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 6:19 AM

लातूर : (Crop Insurance) पंतप्रधान पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे याचा विसरच खासगी कंपन्यांना पडला होता. त्यामुळे आता थेट पीकविमा योजनेत बदल करण्यात आला असून यासाठी सरकारी (Insurance Company) विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांचा मनमानी कारभार तर बंद होणारच आहे पण शेतकऱ्यांना आता अपेक्षित विमा रक्कम मिळेल असा आशावाद आहे. गतवर्षी तर झालेल्या नुकसानीच्या तुलनेत तर विमा मिळालाच नाही आणि रब्बी विम्यापासून शेतकरी हे वंचित राहिले होते. त्यामुळे यंदा बदल झाल्यानंतर (Farmer) शेतकऱ्यांना काय फायदा होणार हे पहावे लागणार आहे.

31 जुलैपर्यंत मुदत

खरीप हंगामातील पीकविमा अदा करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत राहणार आहे. त्यापुर्वी शेतकऱ्यांना खरिपातील पिकांचा विमा भरावा लागणार आहे. यावर्षीपासूनच नवीन पॅटर्नप्रमाणे विमा वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असे असले तरी बहुतांश अटी-नियम या पूर्वीच्याच राहणार आहेत. यामध्ये काही जाचक अटींमध्ये बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांना ग्राहक सेवा केंद्रावर विमा अदा करावा लागणार आहे.

पूर्वसूचनेच्या अटीवरुन शेतकऱ्यांमध्ये असंतोष

गतवर्षी नुकसानीच्या पूर्वसूचना हाच मुद्दा कळीचा बनला होता. या अटीमुळे अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिले होते. नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपनीला नुकसान झाल्याची कल्पाना देणे बंधनकारक होते. हीच अट आताही कायम ठेवण्यात आली आहे. ही अट रद्द केली तरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. शिवाय लोकप्रतिनीधींनीही या अटीवरोधात भूमिका घेतली तर बदल होऊ शकतो. अन्यथा गतवर्षी झाले तेच यंदाही अशी स्थिती निर्माण होण्याची धास्ती आहे.

हे सुद्धा वाचा

बदलत्या परस्थितीनुसार विमा भरणे गरजेचे

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरिपातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीचा विचार करुन पिकांचा विमा अदा करणे गरजेचे आहे. शिवाय पेरा झालेल्या क्षेत्रावरील पिके धोक्यात आहेत. पिके किडीच्या प्रादुर्भावात येतील अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे पिकांना विम्याचे संरक्षण महत्वाचे झाले असून बदलत्या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.