AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk Production : जनावरांना हा चारा दिल्यास वाढेल उन्हाळ्यातही दुधाचे उत्पादन, जाणून घ्या दुधाच्या गुणवत्तेविषयी

उन्हाचा तडाखा असल्याने गायी, म्हशी सावलीत बांधायला हव्यात. सकाळ-संध्याकाळ पाण्याने जनावरांना आंघोळ घालावी. यामुळे जनावरे स्वस्त राहतात. उन्हाळ्यात जनावरांना देणारी तीन प्रकारचे गवत पाहुया.

Milk Production : जनावरांना हा चारा दिल्यास वाढेल उन्हाळ्यातही दुधाचे उत्पादन, जाणून घ्या दुधाच्या गुणवत्तेविषयी
| Updated on: Jun 10, 2023 | 6:27 PM
Share

उष्ण वारे वाहत आहेत. सकाळी दहा पासून उन्हाचा प्रभाव जाणवतो. माणसासोबत पशूंनाही उन्हाचा फटका बसतो. अधिक उन्हामुळे काही जनावरं कमी दूध कमी देतात. परंतु, आता शेतकऱ्यांना टेंशन घेण्याची गरज नाही. शेतकरी उन्हाळ्यातही चांगल्या प्रकारे दुधाचे उत्पादन घेऊ शकतात. यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचा गवत जनावरांना चारावा लागेल. पशू वैद्यकांचं म्हणण ऐकलं तर उन्हाळ्यात जनावर सुस्त होतात. तसेही ते चारा खाणे कमी करतात. त्यामुळे दूध देण्याची उत्पादन क्षमता कमी होते. अशावेळी शेतकरी जर विशिष्ट प्रकारचे गवत लागवड करत असतील, तर दुधाचे उत्पादन चांगले घेता येते. उन्हाचा तडाखा असल्याने गायी, म्हशी सावलीत बांधायला हव्यात. सकाळ-संध्याकाळ पाण्याने जनावरांना आंघोळ घालावी. यामुळे जनावरे स्वस्त राहतात. उन्हाळ्यात जनावरांना देणारी तीन प्रकारचे गवत पाहुया.

नेपीअर गवत : नेपीअर हे थायलँडचे गवत आहे. रंतु, आता भारतात शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत. हे गवत ऊसासारखं आहे. भारतातील लोकं याला हत्ती गवत म्हणून ओळखतात. हे गवत पडीक जमिनीवरही उगवते. यात खर्चही खूप कमी येते. सामान्य गवताच्या तुलनेत नेपीअरमध्ये २० टक्के अधिक प्रोटीन्स असतो. शिवाय ४० टक्के क्रूड फायबर असतो. नेपीअर गवत लावल्यानंतर ४५ दिवसांत तो तयार होतो. हे गवत जनावरांना चारल्यास जनावरे चांगला दूध देतात.

कंबाला चारा : ज्या शेतकऱ्यांकडे शेतीसाठी जमीन नाही, असे शेतकरी कंबाला चारा घरीच तयार करू शकतात. कंबाला चाऱ्याच्या शेतीसाठी फ्रीजसारखी रॅक तयार केली जाते. या संरचनेला हायड्रोपॉनिक्स कंबाला मशीन म्हणून ओळखले जाते. या मशीनमध्ये गवत उगवण्यासाठी साचे तयार केले आहेत. त्यात बी टाकून गवत उगवता येते.

अझोला पशू चारा : अझोला पशू चारा पाण्यात उगवले जाणारे गवत आहे. या जनावरांच्या प्रोटीन सप्लीमेंट म्हणून ओळखले जाते. अझोल्यामध्ये मॅग्नेशीयम, तांबे, फॉस्फरस, लोहा आणि कॅल्शीयमसह कित्तेक पोषक तत्व असतात. शिवाय यात दुधाचे उत्पादन वाढवणारे अमिनो अॅसिड, प्रोबायोटिक्स आणि बायोपॉलीमरसह विविध प्रकारचे व्हिटामीन असतात. अझोला दिल्यानंतर जनावरांच्या दुधात वाढ होते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.