AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये 9 ऑगस्टला जारी होणार, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती, टीव्ही 9 च्या बातमीवर शिक्कामोर्तब

टीव्ही 9 नेटवर्कच्या वतीनं पहिल्यांदा पीएम किसान योजनेचा हप्ता 9 ऑगस्टला जारी होऊ शकतो, अशी बातमी दिली होती.

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये 9 ऑगस्टला जारी होणार, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती, टीव्ही 9 च्या बातमीवर शिक्कामोर्तब
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 06, 2021 | 11:52 AM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता असेल. यावेळी सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपये पाठवले जातील. टीव्ही 9 नेटवर्कच्या वतीनं पहिल्यांदा पीएम किसान योजनेचा हप्ता 9 ऑगस्टला जारी होऊ शकतो, अशी बातमी दिली होती. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र परंतु या कार्यक्रमापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 ऑगस्टला नरेंद्र मोदी 12.30 वाजता दोन हजार रुपये वर्ग करतील, अशी माहिती दिलीय. त्यामुळे टीव्ही 9 नेटवर्कच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय.

नरेंद्र सिंह तोमर यांचं ट्विट

कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना संदेश

नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये”पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या संवादानंतर ते पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील. तुम्ही pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शन द्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. हा मेसेज तुम्हाला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आहे. “, असं नरेंद्र सिंह तोमर म्हणाले आहेत.

अर्जाची स्थिती कुठे पाहायची?

जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधीच अर्ज केला असेल. परंतु, आजपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर त्याची स्थिती जाणून घेणे खूप सोपे आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर भेट द्या. तिथे फार्मर कॉर्नरवर जाऊन, तुम्ही तुमचा आधार, मोबाईल आणि बँक खाते क्रमांक टाकून पैसे येण्याची स्थिती जाणून घेऊ शकता.

अर्ज कुठे करायचा

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे. तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in भेट देऊन स्वतः अर्ज करू शकता. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.

मोदी सरकारची सर्वात यशस्वी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. योजनेचा नववा हप्ता 9 ऑगस्टला जारी होत आहे.

इतर बातम्या :

PM Kisan : पीएम किसान योजनेचा नववा हप्ता 9 ऑगस्टला जारी होणार, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या शेतकऱ्यांना महत्वाचा संदेश

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार

Union Agriculture Minister Narendra Singh Tomar tweet and said 9th installment of PM kisan scheme released by Narendra Modi on 9 August

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?