AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार

TV9 मराठी तुम्हाला पहिल्या हप्त्याची माहिती सातत्याने देत आहे. गेल्या आठवड्यात असेही सांगण्यात आले होते की, 10 ऑगस्टपर्यंत पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकतो.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार
PM Kisan Samman scheme
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 1:46 PM
Share

नवी दिल्लीः पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 9 व्या हप्त्याबद्दल मोठी बातमी समोर आलीय. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 9 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. TV9 मराठी तुम्हाला पहिल्या हप्त्याची माहिती सातत्याने देत आहे. गेल्या आठवड्यात असेही सांगण्यात आले होते की, 10 ऑगस्टपर्यंत पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकतो.

या योजनेत नोंदणी केली नसेल तर उशीर करू नका

जर तुम्ही अद्याप या योजनेत नोंदणी केली नसेल तर उशीर करू नका. तुम्ही या आठवड्यात नोंदणी केली, तर हे शक्य होणार आहे. पडताळणीनंतर तुम्हाला 9 व्या हप्त्याचा लाभ देखील मिळू शकेल. त्याची ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी खुली आहे. केवळ गेल्या दोन महिन्यांत 21 हजार कोटी रुपये थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर शेतीसाठी पाठवण्यात आलेत.

अशा प्रकारे अर्ज करा

पीएम-किसान पोर्टलला भेट द्या (@pmkisan.gov.in). एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला फार्मर कॉर्नर्सचा पर्याय दिसेल. त्यावर नवीन फार्मर रजिस्ट्रेशन मिळेल. यावर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल.

फॉर्म पूर्ण भरा, त्यात योग्य माहिती भरा

यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि कॅप्चा टाकण्यास सांगितले जाईल. तो भरल्यानंतर Click Here वर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यावर एक नवीन पान उघडेल, ज्यात तुम्हाला फॉर्म दिसेल. हा फॉर्म पूर्ण भरा, त्यात योग्य माहिती भरा.

सातबारा क्रमांक आणि खाते क्रमांक भरा आणि सेव्ह करा

यामध्ये बँक खात्याची माहिती भरताना आयएफएससी कोड व्यवस्थित भरा आणि सेव्ह करा. त्यानंतर दुसरे पान उघडेल, ज्यात तुम्हाला तुमच्या जमिनीचा तपशील विचारला जाईल. सातबारा क्रमांक आणि खाते क्रमांक भरा आणि सेव्ह करा. तुमची नोंदणी प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

चार हजार रुपये मिळणार

पंतप्रधान किसान सन्मान निधीशी संबंधित डेटाची ही बाब आहे. आता आपल्या फायद्याबद्दल बोलूया. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4000 हजार रुपये मिळण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. या वर्षाचा पहिला हप्ता जारी झालाय आणि दोन हप्ते शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पात्र शेतकरी ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, जर त्यांनी स्वतःची नोंदणी केली, तर त्यांना आठव्या आणि नवव्या हप्त्याचे 2-2 हजार मिळू शकतात म्हणजे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत.

संबंधित बातम्या

सरकारच्या ‘या’ योजनेत तुमच्या मुलीला 15 लाख मिळणार, शिक्षण अन् लग्नासाठी मदत होणार

‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीत कंपन्या स्त्रियांना देतायत जास्त पगार, पॅकेजमध्ये 70 टक्क्यांपर्यंत वाढ

pm kisan samman nidhi Big news for farmers! Rs.2000 of 9th installment will reach the farmers’ account on 9th august 2021

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.