AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या ‘या’ योजनेत तुमच्या मुलीला 15 लाख मिळणार, शिक्षण अन् लग्नासाठी मदत होणार

पीएनबी (PNB) मध्ये सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडून तुम्ही तुमच्या मुलीला करोडपती बनवू शकता. या खात्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

सरकारच्या 'या' योजनेत तुमच्या मुलीला 15 लाख मिळणार, शिक्षण अन् लग्नासाठी मदत होणार
Girl-Child
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 11:06 AM
Share

नवी दिल्ली: जर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुम्हाला एक विशेष सुविधा देत आहे. पीएनबीने ट्विट करून या सुविधेची माहिती दिली आहे. बँकेच्या या ऑफरमध्ये तुम्ही तुमच्या मुलीसाठी 15 लाख रुपये सहज वाचवू शकता. पीएनबी (PNB) मध्ये सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडून तुम्ही तुमच्या मुलीला करोडपती बनवू शकता. या खात्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

तुम्ही 15 लाख रुपये कसे कमवाल?

सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेचा एक भाग म्हणून या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेमध्ये पालक एका मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडू शकतात आणि दोन वेगवेगळ्या मुलींच्या नावे जास्तीत जास्त दोन खाती उघडता येतात.

पीएनबीने ट्विट केले

पंजाब नॅशनल बँकेने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुम्ही आणि आम्ही तुमच्या छोट्या मुलीच्या स्वप्नांना एक नवीन भरारी देण्यास मदत करू. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://tinyurl.com/rwy2e9je

पीएनबी

या व्यतिरिक्त PNB तर्फे एक फोटोदेखील जारी करण्यात आलाय, ज्यात असे लिहिले आहे की कधी शिक्षक, कधी डॉक्टर, कधी सुपरगर्ल बनतील, असे म्हटले आहे. आम्ही तयार आहोत आणि तुम्ही? सुकन्या समृद्धी योजना

किती पैसे जमा करायचे?

यामध्ये किमान रक्कम 250 रुपये जमा करावी लागते. या व्यतिरिक्त तुम्ही जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांपर्यंत पैसे जमा करू शकता. हे खाते उघडून तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून आणि पुढील खर्चापर्यंत मदत मिळणार आहे.

किती व्याज मिळणार?

सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक व्याजदर 7.6 टक्के आहे. हे व्याजदर केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी सुधारित करते. यामध्ये अनेक लहान बचत योजनांचा समावेश आहे. याशिवाय ग्राहकांना या योजनेत कर सूटचा लाभही मिळतो.

हे खाते कधी मॅच्युरिटी होते

मुलगी 18 वर्षांची झाल्यास सुकन्या समृद्धी खाते उघडण्याच्या तारखेपासून किंवा लग्नाच्या वेळी (लग्नाच्या तारखेनंतर 1 महिना आधी किंवा तीन महिन्यांनी) 21 वर्षांनी मॅच्युरिटी होते.

कोणती कागदपत्रे द्यावी लागतील?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीचा जन्म दाखला फॉर्मसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सादर करावा लागेल. याशिवाय मुलाचे आणि पालकांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि ते कुठे राहत आहेत, याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल) सादर करावा लागेल.

15 लाख रुपये मिळणार?

जर तुम्ही या योजनेमध्ये दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक केली, म्हणजेच 36000 रुपये वार्षिक लागू केल्यावर 14 वर्षांनंतर तुम्हाला 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्षांनी म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये असेल.

या योजनेत कोण खाते उघडू शकते?

>> सुकन्या समृद्धी खाते पालकांच्या मुलीच्या नावाने उघडता येते. >> हे खाते मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांच्या वयापर्यंत कधीही उघडता येते. >> एका मुलीच्या नावे फक्त एकच खाते उघडता येते. >> एकाच मुलीसाठी पालक स्वतंत्र खाती उघडू शकत नाहीत. >> कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येते. >> जुळ्या मुलांच्या बाबतीत दोनपेक्षा जास्त खाती उघडण्याची परवानगी आहे.

संबंधित बातम्या

‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीत कंपन्या स्त्रियांना देतायत जास्त पगार, पॅकेजमध्ये 70 टक्क्यांपर्यंत वाढ

स्मार्ट सेव्हिंग: अशा प्रकारे वैयक्तिक कर्जावरील व्याज करा कमी, कर्ज घेण्यापूर्वी 4 टिप्स जाणून घ्या

Your daughter will get Rs 15 lakh under the government’s sukanya samriddhi scheme, which will help in education and marriage

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.