लॉकडाऊनमध्ये कोकणातील तरुणाचा आधुनिक शेतीचा निर्णय, माळरानावर काजू लागवड

नोकरी गेल्यांनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील देगांव या गावातील विराज मोरे या उच्चशिक्षित तरुणाने आपल्या गावाकडे जाऊन आधुनिक शेती केलीय. (Viraj More started farming at village during lockdown)

लॉकडाऊनमध्ये कोकणातील तरुणाचा आधुनिक शेतीचा निर्णय, माळरानावर काजू लागवड

रत्नागिरी- कोरोनाच्या संकटात अनेकांनां नोकऱ्या गमावाव्या लागल्या. मुंबईत कोकणातून नोकरीसाठी गेलेल्या तरुणांनाही याचा फटका बसला त्यांचीही परिस्थिती वेगळी नाही. नोकरी गेल्यांनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील देगांव या गावातील विराज मोरे या उच्चशिक्षित तरुणाने आपल्या गावाकडे जाऊन आधुनिक शेती केलीय. एक एकर जमिनीत हळद लागवडीसह 15 एकरामध्ये आंबा आणि काजूच्या रोपांची लागवड केलीय. लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावल्यावर खचून न जाता गावाकडे उत्पान्नाचा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करताना मित्रांचीही मदत घेतली. (Viraj More started farming at village during lockdown)

संकटाकडे संधी म्हणून पाहिलं

लॉकडाऊनच्या संकटात विजय मोरे यांनी गावाकडेच आनंदी जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी निवडला. टाळेबंदीच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले. कित्येक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. मात्र ,अशा संकटाच्या काळाकडे विराज मोरे यानं संधी म्हणून बघितलं.विराज मोरे याचे मूळगाव कोकणातले मात्र आतापर्यंत तो गावाकडे गेला नव्हता. विराजचा जन्म आणि शिक्षण मुंबईमध्ये झाले आहे.

लॉकडाऊन काळात तो प्रथमच आपल्या दापोली तालुक्यातील देगांव या मूळ गावी आला होता. सतत कामात राहण्याची सवय असलेल्या विराजला टाळेबंदीचा सुरुवातीचा काळ खूपच असह्य करणारा होता. मात्र, यावर मात करत त्यांनं वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. गावातीलच काही तरुणांना सोबत घेऊन त्यांच्याही उदरनिर्वाहाचा मार्ग मानून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.

हळदीसह आंबा, कोकम,काजू लागवड

कोकणातील पारंपारिक भात शेतीला फाटा देत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करून सर्वाधिक मागणी असलेल्या कोकणच्या हळदीची लागवड विराजने केली. एक एकर क्षेत्रात हळदीची लागवड केली आहे. वर्षानुवर्षे ओसाड असलेल्या माळरानावरील 15 एकर जागेत विजयने आंबा , काजू , कोकमच्या दोन हजार रोपांची लागवड केलीय. लॉकडाऊनमुळे गावातील ज्या तरुणांना मुंबईतील नोकऱ्या गमवाव्या लागल्या, त्यांनाही सोबत घेऊन विराज शेतीमध्ये नवे प्रयोग करतोय.

हळद शेतीचा पर्याय

कोकणातल्या पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या हळद पिकाचा विराजनं स्वीकारला. विराजच्या या निर्णयाने कोकणातल्या शेतकऱ्यांपुढे भातशेतीसोबत हळदीची लागवड करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भव लक्षात घेता अनेक चाकरमानी कोकणातील गावाकडे आले, ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेती करने पसंद केले. लॉकडाऊनसारख्या संकटातून विराजसारख्या तरुणांनी आधुनिक शेती करण्याचा स्वीकारलेला मार्ग इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात स्वच्छता केली. जून- जुलै महिन्यात रोपांची लागवड केली. लॉकडाऊनमुळं दोन हजार झाडांची लागवड करता आली,असं विराज मोरे यानं सांगितले. आगामी काळात रोपं वाचवण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती विराज मोरेचा मित्र सागर याने दिली.

संबंधित महत्वाच्या बातम्या :

रत्नागिरीमध्ये आणखी एका धरणाला गळती, तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती

Corona Update | रत्नागिरी, औरंगाबादमध्ये पर्यटन व्यवसायाला लॉकडाऊनमुळे मोठा फटका

(Viraj More started farming at village during lockdown)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *