Weather Update: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पाऊस बरसणार?, राज्यातील आजचं वातावरण कसं राहणार?

Weather Update: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पाऊस बरसणार?, राज्यातील आजचं वातावरण कसं राहणार?
प्रातिनिधिक फोटो

Weather Update Maharashtra : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Yuvraj Jadhav

|

May 31, 2021 | 10:57 AM

मुंबई: राज्यात पुढील चार दिवस हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. महाराष्ट्रातील विविध भागात रविवारी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी आज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात पावसाच्या सरी बरसतील, अशी माहिती दिली आहे. राज्यावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतंय, त्यामुळेच राज्यात पावसाची शक्यता आहे. (Weather Update Maharashtra IMD predicts pre monsoon rain in various districts of state)

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी गेल्या 24 तासात, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परीसरात हलक्या पावसाच्या सरी पडल्या, असल्याची माहिती दिली. याशिवाय याचं परिसरात आजही ढगाळ आकाश व हलक्या पावसाच्या सरीची आजही कोसळतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात मान्सून उशिरा दाखल होणार

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडू शकतो. आयएमडीचे माजी प्रमुख हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी याविषयी माहिती दिली आहे. केरळात मान्सून 3 जून रोजी दाखल होईल. मात्र राज्यातील परिस्थिती पाहता तो वेळेत न येता चार पाच दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे.

मान्सून 3 जूनला केरळमध्ये

भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते.

यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सांगलीत खरिप हंगामाची तयारी सुरु

मान्सून दाखल होण्याची चाहूल आणि तोक्ते चक्रिवादळामुळे पाऊस पडल्याने घातीला आलेल्या शिवारात खरीप हंगामाच्या तयारीची लगबग सांगली जिल्ह्यात सुरू आहे. तर, इंधन दरवाढीमुळे बैलजोडीच्या मेहनतीकडे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

संबंधित बातम्या:

Yaas Cyclone: महाराष्ट्रालाही ‘यास’चा फटका बसणार; आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Weather update : पुढील तीन तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज

(Weather Update Maharashtra IMD predicts pre monsoon rain in various districts of state)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें