Weather Alert: सोलापूरच्या बार्शीत पावसाची हजेरी, सातारा जिल्ह्याला इशारा, राज्यासाठी दोन दिवस महत्वाचे

सोलापूरच्या बार्शीमध्ये पावसांनं हजेरी लावली आहे तर साताऱ्यात पावसाची शक्यता आहे. Weather Update Solapur Barshi Satara

Weather Alert: सोलापूरच्या बार्शीत पावसाची हजेरी, सातारा जिल्ह्याला इशारा, राज्यासाठी दोन दिवस महत्वाचे
प्रातिनिधिक फोटो

सोलापूर: राज्यात गेल्या तीन दिवसापासून विविध ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावलीय. हवामान विभागान वर्तवलेल्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. बार्शी शहर आणि तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. बार्शीमध्ये सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. उकाड्यामुळे हैराण झालेल्या बार्शीकराना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पुढील दोन तासांत मायणी वडुज दहिवडी उंब्रज औंध वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर. या जिल्ह्यात पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसलाय, मात्र अजूनही 7 मे पर्यंत हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह जोरदार पूर्व मोसमी पावसाचा इशारा दिला आहे. (Weather Update rain showered in Solapur Barshi IMD alerts rain in Satara with thunderstorm in Maharashtra till 7 May)

सोलापूरच्या बार्शीमध्ये पावसाची हजेरी

सोलापूर जिल्ह्यात बार्शी शहर आणि तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. बार्शीत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. उकाड्यामुळे हैराण झालेल्या बार्शीकराना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पुढील दोन तासांत मायणी वडुज दहिवडी उंब्रज औंध वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गारपीट होण्याचा अंदाज

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात निर्माण झाल्यानं मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात 7 मे पर्यंत गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. गेल्या 24 तासात बुलडाणा इथं सर्वाधिक 30 मी.मी पावसाची नोंद करण्यात आलीये तर पुण्यातही 27 मीमी पावसाची नोंद करण्यात आली

शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज

हवामान विभागानं 7 मेपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शेतकऱ्यांनी पावसाच्या दृष्टीने गोळा केलेल्या पिकांवर आच्छादन टाकणं गरजेचं आहे. विजांचा कडकडाट आणि पाऊस यापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

वीज कोसळत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन

राज्यात 7 मेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यासह पुणे घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय, मात्र, या काळात वीज कोसळण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याची तीव्रता जास्त असल्यानं जीव जाण्याचं प्रमाण आहे, त्यामुळे ढगाळ वातावरणानंतर विजा कडकत असताना मोकळ्या वातावरणात न फिरण्याचं आवाहन पुणे हवामान वेधशाळेनं केलंय.

संबंधित बातम्या:

Weather Alert : राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, मुंबईसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Weather Alert : दिल्ली गारठली, महाराष्ट्र कुडकुडणार? काय आहे हवामानाच अंदाज

(Weather Update rain showered in Solapur Barshi IMD alerts rain in Satara with thunderstorm in Maharashtra till 7 May)